Breaking news

धर्माबाद तहसीलतर्फे हळदी कुंकू व गरजु व होतकरू मतदारांना ड्रेस वाटप

नांदेड(प्रतिनिधी)राष्‍ट्रीय मतदार दिनामित्‍त्‍य तहसील धर्माबाद येथे महिलांसाठी हळदीकुंकाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन तहसील येथील कर्मचारी व अधिकारी यांच्‍याकडून करण्‍यात आले होते. यावेळी गरजु आणि होतकरु भावी मतदारांना ड्रेस वाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणुन तहसीलदार धर्माबाद ज्‍योती चौहान तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन वॉस्‍टर एम.डी. जि.प.शाळा धर्माबाद या उपस्थित होते. तहसीदार धर्माबाद व प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते गरजु व होतकरुन भावी मतदारांना तहसील कार्यालयाकडून ड्रेस वाटप करण्‍यात आले. तहसीलदार ज्‍योती चौहान यांनी मतदानाचे महत्‍व पटवून देऊन महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सौ.वत्‍सला पाटील, शामला पाटील, मीना गिरी, सौ.वानोळे, वर्षा दुडले, सौ. बच्‍चेवार, सौ.सिरमेवार जि.प.शाळा धर्माबाद येथील सहशिक्षीका उपस्थित होत्‍या. या कार्यक्रमाचे विशेष म्‍हणजे श्री.आसवार सर हु.पानसरे प्रा.शाळा धर्माबाद यांनी काढलेली निवडणूकीत युवकांनी मतदान करण्‍यातबाबत बोध देणारी रांगोळी सर्वांचे लक्ष वेधीत होती. सदरील कार्याक्रमाचे सौ.गवारगुरु एस.एस. यांनी उत्‍तम असे सुत्रसंचन केले व हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी सौ.पापुलवार पी.एन., सौ.दिपाली अष्‍टुरे, सौ.पांचाळ एस.सी., सय्यदा फिरदोस , वाघमारे सिमा,कु.विद्या घुमडे यांनी मेहनत घेतली.

Related Photos