धर्माबाद मध्ये जनतेला लावण्यात आला फक्त 56 लाख 72 हजारांचा चुना

नांदेड(खास प्रतिनिधी)धर्माबाद येथे एका बोगस कंपनीच्या पाच जणांनी गावातील अनेकांना मिळून 56 लाख 72 हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना पोलीस दप्तरी दाखल झाली आहे.

संतोष ओमप्रकाश चिद्रावार रा.शंकरगंज धर्माबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साई सिध्दी मार्केटींग नावाची नोंदणीकृत संस्था मुख्यकार्यालय पुणे येथे आहे.त्या कंपनीच्यावतीने अंबेजोगाई येथील संदीप हजारी,स्नेहलता हजारी,शंकर शिवरंगे,काशिनाथ सांगळे आणि गोरखनाथ गोविंद हे पाच जण धर्माबाद मध्ये कामकाज पाहत होते. धर्माबाद आणि आसपासच्या अनेक लोकांना त्यांनी 1 हजार रुपये हप्ता दरमहा भरायचा आणि शेवटचा हप्ता 2 हजार रुपये भरायचा अश्या आशयाचे सदस्य बनवले.पूर्ण 14 हजार भरले तर प्रत्येक सदस्यास एक गृहउपयोगी वस्तू देण्याचे अमिश दाखवले होते.पण वर्षभरात अनेक जण या संस्थेत सदस्य झाले.

प्रत्येकाने 14 हजार रुपये भरले तरीपण कोणत्याही सदस्यास गृहउपयोगी वस्तू न देता या कंपनीच्या लोकांनी पळ काढला आहे. त्यात एकूण 56 लाख 72 हजार रुपयांचा चुना लोकांना लावून ते पाच जण लंपास झाले आहेत. धर्माबाद पोलीस ठाण्यात साई सिध्दी मार्केटींग कंपनी आणि त्याचे संचालक संदीप हजारी,स्नेहलता हजारी,शंकर शिवरंगे,काशिनाथ सांगळे आणि गोरखनाथ गोविंद यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम 420 406,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस उप निरीक्षक अंगद सुडके हे करीत आहेत.

Related Photos