उमरी तालुक्यातील बितनाळसह पाच गावचा मतदान वर बहिष्कार

उमरी(संजय मारावार)तालुक्यातील ग्रामीण भागात येणाऱ्या बितनाळ येथे पाच गावच्या लोकांनी एकत्रित येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. तसेच राजकीय पक्षाव नेत्यांच्या गाडया अडवण्यात आल्या असून, प्रवेश निषेध असल्याचे बैनर झळकाविण्यात आले आहे.

विविध नागरी व मूलभूत सुविधा देण्यासाठी आजवरच्या सर्वच नेत्यांनी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ, सावरगाव, बोथी, तुराठी, मोखांडी या पाच गावचा नागरिकांनी सामूहिक बैठक घेऊन जि. प. प. स. निवडणूकीवर बहिष्काराचे बॅनर झळकाविले आहे. तसेच मतदानाचा जोगावा मागण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या गाड्या अडवून प्रवेश निषेध असल्याचे बैनर लावण्यात आले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला मतदान पेटया गावात घेऊन येवू न देण्याची तयारी चालू आहे. यापूर्वी सुद्धा या गावातील नागरिकांडी मतदानावर बहिष्कार टाकला होता, जिल्हाधिकारी व खासदार व आमदारांच्या आश्वासनानंतरही काहीच मिळाले नसल्याने या पाच गावच्या नागरिकांनी हि टोकाची भूमिका घेतली आहे. यासाठी अनेक अधिकारी गावकऱ्यांच्या बोलणीसाठी गेले मात्र गावकरी बहिष्कारावर ठाम असल्याने दिग्गज नेत्यांसह पालकमंत्र्यांच्या शब्दाला सुद्धा ठार दिला नाही. त्यामुळे येथील नागरिकांचा मतदानावरील बहिष्कार ठाम असल्याचे दिसून येत आहे.

Related Photos