उमरी तालुक्यातील बितनाळसह पाच गावचा मतदानवर बहिष्कार १०० टक्के यशस्वी

उमरी(संजय मारावार)तालुक्यातील बितनाळ सह पाच गावच्या लोकांनी एकत्रित येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या आश्वासनाला न भुलत १०० टक्के बहिष्कार यशस्वी केला आहे.

दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हाभरात मतदान पार पडले मात्र उमरी तालुक्यातील बोथी, तुराटी, सावरगाव (कला), बितनाळ मोखंड़ी या गांवाच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार यशस्वी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उमरी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी दळण - वळणाच्या साधनाचा मुख्यरस्त्यासाठी ड़ांबरीकरण व्हावे, नाल्यातिल पुलास मंजूरी मिळवून तात्काळ कार्यवाही व्हावी. या दृष्टीने मतदानावर अंदाजे 4900 लोकांनी बहिष्कार टाकला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आतापर्यंत पाच लोकांचे जिव गमवावे असे गावकरी मंडळीचे म्हणणे आहे. महामंडळाची बस पाऊस पड़लेल्या पुरात अड़कली व 35 लोकांचे जिव धोक्यात आले होते. सावरगाव येथील लोकांनी गावातिल दोरी आणुन महामंडळाच्या बसला काढण्यात हातभार लावला होता. असे अनेक संकटाना तोंड़ द्यावे लागत असल्यामुळे येथील मतदार बांधवानी मुख्य रस्त्यासह अन्य प्रश्न शासन दरबारी अनेक प्रयत्न करून देखिल सुटले नाही. ग्रामस्थाना मागणी मान्य करून घेण्यात यश न आल्यामुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असलेल्या सौ.जिजाबाई साहेबराव पाटिल शिंदे ह्यांनी देखिल मतदानावर बहिष्कार टाकुन निषेध नोंदवला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी, खासदार, पालकमंत्री आमदारांच्या विनंतीनंतरही पाच गावच्या नागरिकांनी हि टोकाची भूमिका कायम ठेऊन बहिष्कार यशस्वी केला. दरम्यान मतदानासाठी ये ठिकाणी उपस्थित झालेले अधिकारी - कर्मचारीव्यतिरिक्त बुथवर अन्य कोणीच फिरकले नव्हते. शांततेत बहिष्कार यशस्वी केल्यांनतर तरी प्रशासन पाच गावातील समस्यांकडे लक्ष देतील कि, पुन्हा येणारी निवडणुकीत येथील ग्रामस्थांना मतदानाचा बहिष्कार टाकून संघर्ष करावा लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Photos