BREAKING NEWS

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ मायच्या गळ्यात घाला.. जनतेची मागणी

BY   Posted On : 22 Apr 2017 2379

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षालाल मोठ्या प्रमाणात यश मिळले आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य माजी आ.माधवराव पाटील त्यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई पवार याना मिळाले आहे. जवळपास ७ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या या जागेला जनतेचा आदर करत पक्षस्रेष्टीने नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बहाल करावे अशी एकमुखी मागणी हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील जनतेतून केली जात आहे.

हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी पाच जागांवर यश मिळवत विजयाचा गुलाल उधळणार्या माधवराव पाटलांना जनतेनी भरभरून पसंती दिली आहे. तर एका जागा अल्पशः मताने प्रभाव पत्करावा लागला आहे. दोन्ही तालुक्याची विकासकामाबाबत होरपळला होत असल्यानेच सत्ताधारी सेनेच्या आमदाराविरुद्ध जनतेच्या मनात असलेला रोष या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडला आहे. मागील दोन वर्षात विकासाला बसललेली खीळ निघावी. आणि गेल्या १० ते १५ वर्षांपासून हदगाव -हिमायतनगर तालुक्याला जिल्हा परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसल्याने विशषतः शैक्षणिक, सामाजिक, नागरी गरजांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील जनतेला प्रामुख्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या मार्गी लावून मागासलेल्या भागाचा विकासाला गती देण्यासाठी जवळगावकरांच्या मातोश्री अर्थातच हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील जनतेची " माय " श्रीमती शांताबाई निवृत्तीराव पवार याना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात यावी अशी दोन्ही तालुक्यातील जनतेतून एकमुखी मागणी करण्यात येत आहे.

आ.प्रदीप नाईक व माधवरावांची भेटी
----------------------
महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तापासून हिमायतनगर तालुक्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच आज दि.२५ रोजी किनवट - माहूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ.प्रदीप नाईक यांनी हिमायतनगर येथे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य, माजी.जी.पसदस्य सुभाष राठोड आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी आजी - माजी आमदारात काय..? चर्चा झाली ते बाहेर आले नसले तरी आगामी काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी हिमायतनगर तालुक्याला शांताबाई पवार यांच्या माध्यमातून मिळणार काय..? अशी चर्चा राजकीय गोटात सुरु आहे.

Tag:
Back to Top