BREAKING NEWS

हिमायतनगर यात्रेतील कुस्त्याच्या फडाला सुरुवात

BY   Posted On : 22 Apr 2017 16138

हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील परमेश्वर यात्रेतील शेवटच्या टप्प्यातील कुस्त्यांच्या फडाला दुपारी ०१ वाजता जेष्ठ संचालक तथा यात्रा कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण शक्करगे यांच्या उपस्थितीत प्रथम नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिमुकल्या बालकांच्या कुस्त्याने फड गाजला. यावेळी मंदिराचे संचालक अनंता देवकते, यात्रा सब कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने, अनिल पाटील, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव, सरदार खान, आश्रफ भाई, ज्ञानेश्वर शिंदे, कुणाल राठोड, विनायक मेंडके, गोविंद शिंदे, राम नरवाडे, सुभाष पाटील, संजय माने, फेरोजखान युसूफखान, दीपक सोनसळे, राजू राहुलवाड, अनिल मादसवार, साईनाथ धोबे, गजानन चायला, फाहद खान, विष्णू जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Tag:
Back to Top