BREAKING NEWS

कुस्तीचा फड नांदेडच्या योगेश मुंडकरने जिंकला तळपत्या उन्हात रंगलेल्या

BY   Posted On : 22 Apr 2017 74178

नांदेड(अनिल मादसवार)भारतात प्रसीध्द असलेली हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फडास दि.०८ मार्च गुरुवारी दुपारी ०१ वाजता बालमल्लाच्या कुस्तीने सुरुवात झाली. यात शेवटची अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती नांदेडच्या योगेश मुंडकरने जिंकुन बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ७ हजारच्या बक्षिसाच मानकरी ठरला आहे.

येथील श्री परमेश्वर मंदिरातून ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक काढून दुपारी ०१ वाजता लहान मोठ्या बालकांच्या कुस्त्याला सुरु झाल्या. याचे उद्घाटन नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमिद यांच्या हस्ते परमेश्वर यात्रा सब कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने यांच्या उपस्थित करण्यात आले. प्रथम संत्र्या मोसंबीच्या कुस्त्या त्यानंतर 10, 20, 30, 50,100, 200 रुपयाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. शेवटची मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी 7001 रुपये आणि दुसर्या क्रमांकाचे 2001 रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. सायंकाळी 5 .30 वाजता सुरु झालेली पहिली मनाची कुस्ती हि नंदीचा योगेश मुंडकर व परभणीच्या उद्धव खडकीकर या दोघांच्या तुल्यबळ लढतीत झाली. हलगीच्या तालावर जवळपास अर्धा तास चाललेल्या कुस्तीच्या फडात पभणीच्या मल्लास धूळ चारवित नांदेडच्या मुंडकरने अव्वल नंबरचा मान मिळऊन कुस्तीचा फड जिंकला. दुस-या नंबरची 2001 रुपयाच्या कुस्ती संभाजी हुस्सेकर व संजय बितनाळीकर या दोघात झाली. हि कुस्ती जवळपास ३५ मिनिटे चांगलीच रंगली होती. अखेर हुस्सेकरला चित्थ करुन संजय बितनाळीकरने दुसऱ्या नंबरचे बक्षीस जिंकले. तसेच 2000 हजारच्या, 1001 रुपयाच्या, तसेच वैयक्तीक कुश्ती शौकीनांनी लावलेल्या 1000 व 500 च्या अश्या मिळुन 51 हजार रुपायाच्या कुस्त्या तळपत्या उन्हात परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, मंदिर समीतीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या.

कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी हदगंाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड, नांदेड, परभणीसह अन्य दुर-दुरच्या ठिकाणाहुन हजारों पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. दरम्यान परभणी येथील अंकुश खांडेकर या युवकाने विविध प्रकारचे कर्तब दाखवीत आश्चर्याचीत करणारे योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यानंतर प्रथम कुस्ती पटकावीणा-या युगेश मुंडकर या पैलवानाचा हातवर उचलुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच बॅेडबाज्याच्या गजरात श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त जय श्रीरामाच्या जैघुश्यात मिरवणुक काढली. मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री महावीरचंदजी श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, विठलराव वानखेडे, माधव पाळजकर, आनंता देवकते, खुदुस मौलाना, परमेश्वर पानपट्टे, नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, ज्ञानेश्वर शिंदे, अन्वर खान, बाबुराव बोड्डेवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पैलवानास बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी संतोष गाजेवार, हानुसींग ठाकुर, सरदार खान, विठ्ठल ठाकरे, सुभाष दारवंडे, गजानन चायल, बाबुराव पालवे, बाबुराव भोयर, प्रकाश जैन, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनील मादसवार, कानबा पोपलवार, साईनाथ धोबे, अशोक अनगुलवार, अनिल भोरे, शाम जक्कलवाड, यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती. कुस्तीचा फड व यात्रेतील सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनीरीक्षक नितीन गायकवाड व एएसआय डांगरे यांनी पोलीसांचा बंदोबस्त लावला होता. यामुळे आजचा हा महत्वाचा कुस्तीचा फड शांततेत पार पडला.

Tag:
Back to Top