BREAKING NEWS

इंटरनॅशनल ऑलिम्पियाड (I.E.O) परीक्षेत गोदावरीच्या विद्यार्थ्यांचे यश

BY   Posted On : 22 Apr 2017 45427

नांदेड(प्रतिनिधी)सायन्स ऑलिम्पियाड फाऊडेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षेत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजच्या एकूण १६ विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत १० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, २ विद्यार्थ्यानी रौप्यपदक तर ४ विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकाविले.

या यशाबद्दल गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी हे यश विद्यार्थ्यांच्या कष्टाचे व मेहनतीचे फळ आहे, असे मत व्यक्त केले. गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजचे विद्यार्थी हे निश्चीतच विविध कलागुणांनी परिपूर्ण असणारे विध्यार्थी आहेत. त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता तर वारंवार सिद्ध करून दाखवलीच आहे, परंतु सांस्कृतिक, क्रीडा व इतर शालेय स्पर्धेत सुद्धा गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या विध्यार्थ्यानी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.

अध्यक्षा सौ.राजश्री पाटील आनंद व्यक्त करतांना म्हणाल्या की, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या शालेय स्पर्धात्मक परीक्षेत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या १६ विध्यार्थ्यानी जे नेत्रदीपक यश संपादन केले ते निश्चीतच गौरवास्पद आहे. शाळा हि विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे केंद्र असते. शाळेत शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र काम करीत असतात. अध्ययान करीत असणारा विध्यार्थी हा शाळेचा श्वास असतो. यावेळी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्याची तयारी करून घेणाऱ्या इंग्रजी विषयाचे प्रा.नितीन हाटकर यांचे विशेषत्वाने अभिनंदन केले. यापुढे सुद्धा वेगवेगळ्या शालेय स्पर्धात्मक परीक्षेत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजचे विध्यार्थी बहुसंख्येने यश प्राप्त करतील असा आशावाद व्यक्त करून, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.सौ.राजश्री पाटील यांनी कौतुक केले.

यावेळी गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजच्या संचालिका मा.सौ.किर्ती तगडपल्लेवार यांनी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले. पुढे त्या म्हणाल्या की, इंग्रजी भाषा अवगत असणे हि काळाची गरज आहे. जगाला जोडणारी भाषेकडे बघितले जाते. अशा स्पर्धात्मक युगात इंग्रजी विषयाच्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षेत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यानी जे यश संपादन केले ते संस्थेच्या, शाळेच्या आणि विध्यार्थ्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची व अभिमानास्पद बाब आहे. या निमित्ताने मा.सौ.किर्ती तगडपल्लेवर यांनी गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत असणाऱ्या सर्व शिक्षकवृंदाचे त्यांनी अभिनंदन केले. गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजचे संस्थेचे सचिव अॅड.रवींद्र रगटे, प्राचार्य तारेख अहमद, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रमेश वानखेडे यांनीही यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच या घवघवीत यशाबद्दल पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत अनुष्का कदम (ई ५ वी) सुवर्णपदक, शिवराज जाधव (ई ४ थी) सुवर्णपदक, ओमसाई पावडे (ई ४ थी) सुवर्णपदक, अरुण बुख्तरे (ई ४ थी) सुवर्णपदक, धनंजय आरगुलवार (ई ५ वी) सुवर्णपदक, अभिषेक धुमाळ (ई ६ वी) सुवर्णपदक, युवराज पतंगे (ई ७ वी) सुवर्णपदक, गायत्री रेवनवार (ई ८ वी) सुवर्णपदक, अश्विनी जडे (ई ९ वी) सुवर्णपदक, रितेश घोरबांड (ई ९ वी) सुवर्णपदक, गौरी पतंगे (ई ५ वी) रौप्यपदक, अदिती झंपलवाड (ई ६ वी) रौप्यपदक, प्रणव सूर्यवंशी (ई ५ वी) कांस्यपदक, कृष्णा जडे (ई ५ वी) कांस्यपदक, सम्यक पोहरे (ई ६ वी) कांस्यपदक गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल अॅंड ज्यु. कॉलेजच्या एकूण १६ विध्यार्थ्यानी यश संपादन केले.

Tag:
Back to Top