BREAKING NEWS

दिग्रस बंधाऱ्यातील धानोरा काळे  येथील पुलाची उंची वाढविण्यासाठी 10 कोटी 38 लक्ष मंजूर

नांदेडकरांना हक्काचे ४० द.ल.घ.मी. पाणी मिळणार

BY   Posted On : 22 Apr 2017 184

दिग्रस बंधाऱ्यातील पालम ते धानोरा काळे या गोदावरी नदीच्या पात्रातील पुलाची उंची वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी 10 कोटी 36 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हा प्रश्न मार्गी लागला आहे.या पुलाची उंची वाढविल्यावर नांदेडकारांना त्यांच्या हक्काचे ४० द.ल.घ.मी.पाणी मिळणार.यासंदर्भातील बैठक ३० मार्च रोजी राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात लावली होती .यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे , जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, आ. हेमंत पाटील ,अधिक्षक अभियंता बी.एस.स्वामी ,कार्यकारी अभियंता बी .के शेटे ,उपअभियंता एन.टी.गव्हाणे उपस्थितीत होते.

दिग्रस बंधाऱ्यात पुर्ण क्षमतेने पाणी अडविल्यास बॅक वॉटर मधील धानोरा काळे येथील पुलावर सात फूट पाणी येऊन रस्ता वाहतुक विस्कळीत होऊन बंद पडत होती. यामुळे तेथील गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटत असे,यामुळे धरणात 25 टक्के पाणीसाठा कमी भरावा लागत होता.गेल्या वर्षी पावसाळा भरपूर झाला होता तरी देखील धरणाची क्षमता ६३.८७ द.ल.घ.मी असताना देखिल धानोरा काळे पुलामुळे ३२.४३ द.ल.घ.मी.एवढाच पाणीसाठा बधार्यात करण्यात आला. यामुळे दिग्रस बधार्यातील लाभक्षेत्रातील शेतकरी व विष्णुपुरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनचे नुकसान होऊ लागले तसेच नांदेडला पाणी सोडताना नेहमी वाद उद्भवत होता.या पुलामुळे नांदेड दक्षिण मधील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अधिकचे पाणी उपलब्ध होईल.

धानोरा काळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गेली सात वर्षापासून नागरिक करीत होते. येथील नागरिक व दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी करीत होते .याची दखल घेत शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे सदरील पुलाच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला.याची दखल घेत जलसंपदा मंत्र्यांनी धानोरा काळे या पुलासाठी 10 कोटी 38 लक्ष रुपये निधी मंजूर केला .या पुलामुळे पालम व पूर्णा या दोन तालुक्याचा पावसाळ्यातील वाहतुकीचा कायमचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच परभणी व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्न सुटला आहे यामुळे दोन्ही जिल्यातील नागरिकव शेतकरी आनंद व्यक्त करत आहे.

Tag:
Back to Top