BREAKING NEWS

गोप्याचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

BY   Posted On : 22 Apr 2017 102

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नावीन्यपूर्ण विषयांवर आधारित असलेले सिनेमे बनत असतात. यात काही वास्तवदर्शा असतात, तर काही काल्पनिक कथानकांवर आधारित... काही समाजाला आरसा दाखवणारे असतात, तर काही केवळ मनोरंजन करणारे... काही केवळ हसवणारे असतात, तर काही अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे... काही समाजातबदल घडवणारे असतात, तर काही नवीन विचार देणारे... थोडक्यात काय तर आज मराठी चित्रपट फक्त मनोरंजन करीत नसून, त्याही पलिकडे जाऊन समाजाला काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचं काम करीत आहेत. “गणेश फिल्म्स ऍण्ड एंटरटेनमेंट”च्या बेनरखाली बनलेला ‘गोप्या’ हा संगीतप्रधान सिनेमा याच वाटेने जाणारा आहे. हा चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमोल भालेराव, नितीन पगारे आणि राज पैठणकर यांची निर्मिती तसेच सर्जेराव मोटे, अतुलराजे गयाळी, धनाजी गायकवाड आणि सुभाष जगधने यांची सहनिर्मिती असलेला ‘गोप्या’ हा चित्रपट म्हणजे आशयघन कथानक आणि कर्णमधुर संगीताचा अद्वितीय संगम आहे. गणेश फिल्म्स एन्ड एंटरटेनमेंटसह ‘गोप्या’ या चित्रपटाद्वारे सॉईल ग्रुप ऑफ कंपनीज् आणि हरिओम मल्टीस्टेट कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आपल्या सॉईल इव्हेन्ट्स एन्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. या कंपनी अंतर्गत प्रथमच मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारी गाणी या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा संगीतप्रकाशन सोहळा नुकताच दादर येथील सूर्यवंशी हॉलमध्ये मोठया थाटात पार पडला. याप्रसंगी गायक-संगीतकार तसेच निर्माता-दिग्दर्शकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कलाकारांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आलेले अनुभव शेअर करीत चित्रीकरणादरम्यान केलेल्या धम्माल मस्तीचं वर्णन केलं. दिग्दर्शक राज पैठणकर यांनी‘ गोप्या’साठी गीतलेखन केलं असून, संगीतकार किरण-राजयांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. यापैकी किरण पैठणकर यांनी “ताना ना ताना ना...” आणि “तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार...” ही गीतं गायली आहेत. “काय असा मी केला गुन्हा...” हे गाणं गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या आवाजात ध्वनीमद्रित करण्यात आलं आहे. “आपली खोड कुणी काढायची नाही...” या काहीशा अवखळ गीताला मास्टर रोहित वाघने आवाज दिला आहे.

‘गोप्या’चे दिग्दर्शक राज पैठणकर यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटातील प्रत्येक गीत वेगवेगळे भाव दर्शवणारं आहे. कथानकाशी समरस होणारी ही गाणी कथेला गती देण्याचं काम प्रदान करतात असंही राज यांचं म्हणणं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या एका मुलाची कथा पाहायला मिळेल. प्रतिकूल परिस्थितीवरमात करीत गोप्या कशाप्रकारे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतो त्याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळेल. आज घडीला लहान मुलांच्या भावविश्वात डोकावणारे बरेच चित्रपट बनत असले तरी ‘गोप्या’ हा चित्रपट लहानग्यांच्या मनातील आजवर कधीही समोर न आलेले भाव व्यक्त करणारा असल्याचं मतही राज यांनी व्यक्त केलं. ‘गोप्या’च्या निमित्ताने संगीत दिग्दर्शन करताना गाण्यातील भाव आणि कथानकाचा आशय यांना अचूक न्याय मिळवून देण्याचं आव्हान समोर होतं असं किरण-राज या संगीतकार द्वयींचं म्हणणं आहे.

‘गोप्या’मधील गाणी केवळ मनोरंजन करण्यासाठी नसून त्यातील व्यक्तिरेखांच्या मनातील भाव संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी आहेत. पटकथा लेखक योगेश महाजन यांनी पटकथेची उत्तम बांधणी केली असून अर्थपर्ण शब्दरचना असलेल्या गीतरचनांची पेरणी त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘गोप्या’साठी संगीत दिग्दर्शन करताना एक वेगळाच अनुभव आल्याचं मतही संगीतकार जोडीने व्यक्त केलं. दिग्दर्शन आणि गीत लेखनासोबतच संगीत दिग्दर्शनही करणाया राज पैठणकर यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. योगेश महाजन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून योगेश सबनीस यांनी संवादलेखन केलं आहे. आदित्य पैठणकर हाबाल कलाकार गोप्याच्या प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत माधवी जुवेकर,कमलेश सावंत, मनीषा पैठणकर, उदयसबनीस, जयवंत वाडकर, अजय जाधव, समीर विजयन, राजेश भोसले, प्रकाश धोत्रे, अमीर तडवळकर, मानसी मुरूडकर, अजित जाधव आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. छाया लेखक अनिकेत के. यांनी ‘गोप्या’चे छाया लेखन केले आहे. देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर हे या सिनेमाचे कला दिग्दर्शक असून अतुल साळवे हे निर्मिती व्यवस्थापक आहेत. नृत्यदिग्दर्शन चिनी चेतन यांनी केलं असून साऊंड डिझाईन सोनू पैठणकर यांनी केले आहे. विशाल कोटकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Tag:
Back to Top