BREAKING NEWS

राजर्षी शाहू विद्यालयाला 3 सुवर्ण व 3 रौप्यपदके

BY   Posted On : 22 Apr 2017 94

दिल्लीच्या सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड (आय.एम.ओ.) परीक्षेत शाळेचे 36 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, एका विद्यार्थ्याला सिल्व्हर मेडल तर एका विद्यार्थ्याला ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले आहे.
सहावीतून शीतल पंडतवाड, आठवीतून अभिजीत वसमते तर नववीतून सुरभी पांपटवार यांना गोल्ड मेडल मिळाले. धनश्री कानगुले हिला सिल्व्हर मेडल तर शिवानी गाढे हिला ब्रॉन्झ मेडल मिळाले.

एम.जी.एम. येथे भरविण्यात आलेल्या व्हिजिओटेक विज्ञानप्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदेश पाईकराव, दीपक चव्हाण, ऋतुजा बोबडे, पियुष येमले, सेजल गंगापूरकर, शुभम्‌ सरपाते, प्रदीप किरतवाड व अभिषेक कोरडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या यशाबद्दल मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत, उपमुअ. एस. आर. कुंटूरकर, पर्यवेक्षक एम.डी. अडेराव आणि सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Tag:
Back to Top