BREAKING NEWS

६ गुण ,,

BY   Posted On : 22 Apr 2017 122

शिक्षण हे महत्वाचे आहे, शालेय जीवनापासून आपली सुरवात होते तेथेच जीवन जगण्याचा पाया तयार केला जातो आणि तोच आपल्याला पुढे आयुष्यात उपयोगी पडतो, प्राथमिक शिक्षण घेत असताना वेळापत्रक, नियोजन त्याच बरोबर इतर वाचन, निरीक्षण ह्याला हि महत्व आहे, असे होत असताना मुलांच्यामध्ये ईर्षा, स्पर्धा उत्पन्न होत असते, त्यातून वादविवाद निर्माण होतात,, नेमका हाच धागा पकडून निर्मात्या उज्वला गावडे यांनी त्यांच्या जी के प्रोडक्शन क्रिएशन या चित्रपट संस्थेतर्फे ६ गुण ह्या चित्रपटाची निर्मिती केली, कथा-पटकथा-संवाद-दिगदर्शन किरण गावडे यांचे आहे, छायाचित्रण सुरेश देशमाने, संकलन रोहिता गोरे यांचे असून किरण गावडे यांच्या गीतांना राज पवार - कपिल रेडकर यांनी संगीत दिले आहे. यामध्ये सुनील बर्वे, अमृता सुभाष, अर्चित देवधर, प्रणव रावराणे, अतुल तोडणकर, अजिंक्य लोंढे, सिद्धेश परब, कपिल रेडकर या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

विद्या सरवदे हा एका गावात प्राथमिक शाळेत शिकत असतो हा ह्या शाळेमधील हुशार विध्यार्थी,, त्याची आई सरस्वती हि कडक शिस्तीची असल्याने त्याला वेळापत्रका प्रमाणे अभ्यासाला बसवते, त्याला शिकवणी लावली जाते, विद्यांचे वडील हे परदेशात नोकरी करीत असतात, सरस्वती हि इतर मुलांना " उनाड मुले " असे संबोधित असते, त्याचवेळी शहरामधून राजू पानसे नावाचा मुलगा त्याच्या वर्गात दाखल होतो, राजू हा हुशार असतोच, त्याला वाचन आणि खेळ ह्यामध्ये गोडी असते विद्याला खेळाची आवड असते पण आईच्या कडक स्वभावामुळे त्याला तिथे जाता येत नाही, राजू आल्याने विद्या हा मागे पडतो, त्याला नैराश्य येण्यास सुरवात होते, वार्षिक परीक्षेत १ ला नंबर आलाच पाहिजे ह्यासाठी त्याच्या आईचा आग्रह असतो, त्याचवेळी विद्या राजुला भेटून काही गोष्टी सांगतो, त्यामुळे राजुला धक्काच बसतो, राजू विद्याच्या आईला सारे काही सांगून टाकतो, त्यामुळे ती अधिकच बेचैन होते, विद्यांचे वडील परदेशातून येतात, हळू-हळू परिस्थिति मार्गस्थ होत जाते,,, विद्या राजुला नेमके काय सांगतो ? विद्यांचे वडील विद्याला कश्या प्रकारे मोकळीक देतात ? त्याचा व्यक्तिमत्व विकास कश्याने होतो ? खेळामध्ये विद्या आपली चमक कश्या प्रकारे दाखवून देतो ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या सिनेमात मिळतील.

पालकांना / मुलांना येणारे मानसिक दडपण, त्यासाठी होणारी स्पर्धा विद्यांची आणि सरस्वतीची सुरवातीची मानसिकता आणि नंतर झालेला बदल ह्यातले सारे बारकावे अमृता सुभाष, अर्चित देवधर यांनी सुरेख दाखवले आहेत, त्याला साथ सुनील बर्वे, अजिंक्य लोंढे, सिद्धेश परब यांची मिळाली आहे, छायाचित्रण, संकलन, संगीत ठीक आहे, आजच्या शिक्षणामध्ये असणारी स्पर्धा, आणि त्यामुळे निर्माण झालेली विध्यार्थी / पालक यांची मानसिकता कशी हवी ? - कशी नको ? असे सांगत असताना हा सिनेमा आजच्या शिक्षण पद्धतीवर सुद्धा भाष्य करतो, विषय चांगला आहे पण अजून थोडी मेहनत घेतली असती तर बरे वाटले असते, आता ह्या सिनेमाला किती गुण मिळतात हे प्रेक्षकच ठरवतील.

Tag:
Back to Top