BREAKING NEWS

मांजरा परिवार आणि लातूरच्या सहकार चळवळीचा गौरव

महाराष्ट्र शासनाकडून विकास सहकारी साखर कारखान्याची ‘सहकार निष्ठ पुरस्कार’ करीता निवड

BY   Posted On : 22 Apr 2017 83

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थाना देण्यात येणारा सन २०१५-१६ चा ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ वैशालीनगर, निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्यास सहकार क्षेत्रात व साखर उद्योगात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था म्हणून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे वतीने लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या विकास सहकारी साखर कारखान्यास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे मांजरा परिवार आणि येथील सहकार चळचळीचा गौरव आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने राज्यातील सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील सहकारी संस्थाच्या कामकाजाचे मुल्यमापन करून विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. यामध्ये सहकारी क्षेत्रातील साखर उद्योगांचा शासनाच्या वतीने तुलनात्मक अभ्यास करून सहकार महर्षी, सहकार भूषण व ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ साठी निवड करण्यात येते. विकास सहकारी साखर कारखान्याचे सहकारी तत्वावरील संस्थात्मक कामकाज, आर्थिक व प्रशासकीय नियोजन, सभासद, कर्मचारी कल्याण योजना, ऊसविकास योजना, ठिबक सिंचन, जलसंधारण योजना,पाणी व्यवस्थापन,ऊसशेती यांत्रीकरण, पाणी पुर्नवापर, वृक्षारोपन, माती परिक्षण, संगणकीकरण या बाबीचा विचार करता विकास कारखान्याचे कामकाज सरस ठरले आहे. यामूळे सन २०१५-१६ करीता विकास सहकारी साखर कारखान्याची ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, कार्यकारी संचालक युनीट १ समिर सलगर, कार्यकारी संचालक युनीट २ अजित देशमुख व सर्व संचालक मंडळ स्विकारणार आहेत.

लातूरच्या सर्वांगीण विकास करायचा असेल ग्रामीण भाग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करावा लागेल ही दुरदृष्टी बाळगून आदरणिय विलासराव देशमुख साहेब यांनी साखर उद्योगाची सहकारी तत्वावर उभारणी केली. त्यांचे मार्गदर्शन व माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांचे नियोजन आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विकास कारखान्याची उभारणी पासून यशस्वी वाटचाल केली आहे. आज विकास सहकारी साखर कारखाना माध्यमातून सहकार चळवळ गतीमान झाली आहे. शेतकरी, कर्मचारी, विविध व्यवसायीक यांच्या सोबत परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. यामूळे ख्यऱ्या अर्थाने सहकार चळवळीचे ध्येय साकार झाले आहे. विकास कारखान्यास मिळालेला महाराष्ट्र शासनाचा ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ म्हणजे खऱ््यया अर्थाने लातूर मधील मांजरा परिवार आणि सहकार चळवळीचा गौरव आहे.

माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विकास सहकारी साखर कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे. कारखान्याने साखर उद्योगाशी निगडीत सर्व प्रकल्पाची उभारणी अल्प काळात करुन आधुनिक परिपूर्ण साखर संकूलचा आदर्श निर्माण केला आहे. येथे राबविण्यात आलेले धोरण, दैनदिन कामकाज, विविध उपक्रमामूळे सहकार चळवळ बळकट झाली आहे. विकास कारखाना माध्यमातून सभासद व कर्मचारी कल्याणाच्या विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. कारखान्याने ऊसउत्पादकांना सर्वोत्तम ऊस दर दिला, ऊसशेती यांत्रीकीकरण योजना, ऊसविकासाच्या विविध योजना, ठिंबक सिंचन योजना, कार्यक्षेत्रात जलसंधारण योजना, शेतकरी मेळावे, शास्त्रज्ञ व ऊसतज्ज्ञाचे मार्गदर्शन, शैक्षणिक सहल, मनुष्यबळ विकास उपक्रम, ऊसउत्पादकांना दिलेल्या विविध सुविधा, योजना, वृक्षरोपन आदी उपक्रमाचे शासनस्तरावर व निवड समिती मधील तज्ज्ञानी कौतुक केले आहे. विशेषता विकास कारखान्याने केलेल आर्थिक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, गतीमान प्रशासन, ऊसविकास योजना, ठिबक सिंचन योजना, जलसंधारण योजना, पर्यावरण संर्वधनासाठी वृक्षारोपन, आपत्ती व्यवस्थापन सुविधा आदी सहकार चळवळ व साखर उद्योग यशस्वीतेसाठी अनुकरणीय असल्याचे मानले जात आहे.

कारखान्यास आता पर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’, ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता’,‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’, ‘उत्कृष्ट ऊस विकास’ ‘सहकारनिष्ठ पारितोषिक’, ‘सहकार भूषण पारितोषीक’ ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’, ‘सर्वोत्कृष्ट चिफ अकौटंट’ व दुसऱ्यांदा मिळालेला ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ या पारितोषीकामुळे कारखान्यास १५ वर्षात २५ पारिताषिके प्राप्त झाली आहेत. या पारितोषिकाने विकास कारखान्यास गौरविण्यात आले, याबद्दल माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख व माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली देशमुख यांनी संचालक मंडळ, सभासद, कार्यकारी संचालक, अधिकारी, कामगार यांचे अभिनंदन केले आहे.
----------------------------------------
विकास कारखाना ‘पथदर्शी कामकाज’
•कारखान्याचे धोरण, संस्थात्मक कामकाज, उपक्रम सहकार चळवळ बळकट करणारे.
•पुरस्कारामूळे लातूर मधील सहकार चळवळ व मांजरा परिवाराचा गौरव.
•शेतकरी व कामगार कल्याण योजनांचे राज्यपातळीवर कौतुक.
•ऊसविकास योजना, ठिबक सिंचन, ऊसशेती यांत्रकीकरण, पाणी व्यवस्थापन,
आर्थिक व्यवस्थापन, वृक्षारोपन योजना सहकार चळवळ यशस्वीतेसाठी पथदर्शी

Tag:
Back to Top