BREAKING NEWS

कृषी सेवेत संधी

BY   Posted On : 22 Apr 2017 309

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील कृषि अधिकारी, महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब संवर्गातील 79 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा -2017 रविवार, दि. 30 जुलै, 2017 रोजी मुंबई, औरंगाबाद, पुणे व नागपूर या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल.

प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार, दिनांक 17 डिसेंबर, 2017 रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषि अधिकारी, महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब या पदासाठी एकूण 79 पदे असून त्यापैकी अनुसूचित जाती- 15+6*,वि.जा.(अ)-2, भ.ज. (ब)-4+7*,भ.ज. (ड)-1, इतर मागासवर्गीय-11, एकूण मागासवर्गीय - 46, खुला-33 अशी पदे आहेत.या पदासाठी उमेदवाराचे वय दि. 01 ऑगस्ट, 2017 रोजी वय किमान 18 वर्षे असावे व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिलक्षम आहे. प्राविण्य प्राप्त खेळाडूंच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथिलक्षम आहे. माजी सैनिक, आणिबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिलक्षम आहे. तर विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता प्राप्त केलेली असावी. शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, क्रमांक आकृवि-1211/प्र.क्र.208/15 ए, दिनांक 07 सप्टेंबर, 2011 अन्वये शासनाने बी.एसस्सी (कृषी)/बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता अशी : (1) बी.एसस्सी (कृषि) (2) बी.एसस्सी. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन) (3) बी.एसस्सी. (गृह विज्ञान) (4) बी.टेक (अन्नतंत्र) (5) बी.एफ.एसस्सी. (6) बी.एसस्सी. (उद्यानविद्या). पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2017 च्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2017 करीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मे, 2017 अशी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://mahampsc.mahaomline.gov.in / www.mpsc.gov.in या संकेतस्थळांस भेट द्यावी.

पत्ता : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
5,1/2, 7 व 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज,
मुंबई – 400 021
दूरध्वनी क्र. 22795900, फॅक्स – 22880524
ईमेल – sec.mpsc@maharashtra.gov.in

Tag:
Back to Top