BREAKING NEWS

साखर खाल्लेला माणूस, जगा जीवन सकारात्मकतेने

BY   Posted On : 22 Apr 2017 82

सध्या विविध विषयावरील नाटके रंगमंचावर येत आहेत, आजच्या घडीला प्रत्येकजण आपापल्या कामात गढून गेलेला दिसून येतोय, धावपळ - पळापळी मुळे त्याला विश्रांती हि कमी मिळते, ऑफिसचे काम, घराकडे लक्ष ह्यामधून खाण्यापिण्याकडे लक्ष कमी होते, मग शरीराला त्रास होतो आणि विविध रोगांना आमंत्रण दिले जाते मग त्या व्याधी शरीरामध्ये घर करतात, अश्याच विषयावरील मध्यवर्ती कल्पना करून " साखर खाल्लेला माणूस " हे नाटक रंगमंचावर प्रशांत दामले फॅन फाउंडेशन, एकदंत क्रिएशन, अष्टविनायक ह्या लोकप्रिय नाटय संस्थेने मिळून सादर केले आहे, विषय गंभीर असला तरी नाटक सकारात्मकतेने आनंद देते, लेखन विद्यासागर अध्यापक यांचे असून दिगदर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे लाभले आहे, प्रशांत दामले, शुभांगी गोखले, ऋचा आपटे, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत, नाटकाचे प्रदीप मुळ्ये, संगीत अशोक पत्की यांचे आहे,

विलास देशपांडे [ प्रशांत दामले ] नावाच्या एका विमा कंपनीच्या रिजनल मॅनेजरची कथा ह्या नाटकात मांडली आहे, विमा कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप धावपळ करावी लागते, त्यांची पत्नी माधवी [ शुभांगी गोखले ] आणि मुलगी ऋचा [ ऋचा आपटे ] असे हे त्रिकोणी सुखी कुटुंब असते. विलासरावांचे घरातल्या मंडळींवर खूप त्यासाठी त्याची धावपळ चाललेली असते, एक दिवस त्यांना मधुमेहाचा आजार झाल्याचे दिसून येते. लगेच माधवी त्यांना आता धावपळ बंद करण्याचा आणि पथ्यपाणी करण्याचा सल्ला देते, त्याचवेळी ऋचाचा मित्र ओंकार हा विलासरावांना भेटायला येतो, त्याचे ऋचावर प्रेम असल्याने तो तिला मागणी घालण्यासाठी विलासरावांना भेटायला आलेला असतो, ओंकार हा मधुमेहाचा तज्ञ डॉक्टर असतो, तो विलासरावांना तपासतो, काळजी घ्यायला सांगतो, विलासराव आधीच वैतागलेले असतात, त्यात ऋचा लग्नाला नकार देते आणि ती गरोदर असल्याचे सांगून बाळाला जन्मही देणाराही असेही सांगते, विलासरावांच्या पायाखालची जमीन सरकायला लागते, माधवीचे डोके सुन्न होते, विलासराव अधिकच चिडचिडे बनतात, जो - तो त्यांना मधुमेह वाढू नये म्हणून सूचना देतात, ह्यातून हे नाटक मधुमेहावर भाष्य करते, मधुमेहा सारखा आजार असूनही विलासराव आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असतात,ऋचाच्या गरोदरपणाचा निकाल पुढे कसा लागतो ? ऋचा आणि ओंकार यांचे पुढे काय होते ? विलासरावांचा आजार कसा आटोक्यात येतो ? ते स्वतःमध्ये कसा बदल करतात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या नाटकात मिळतील ? गंभीर विषयाची मांडणी गमतीदार पद्धतीने केली आहे,

विलासरावची मध्यवर्ती भूमिका प्रशांत दामले यांनी आपल्या खास पद्धतीने प्रसन्नपणे सादर केली आहे, नाटकातील गंभीर विषय हसत-खेळत सादर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शुभांगी गोखले, ऋचा आपटे, संकर्षण कऱ्हाडे यांची उत्तम साथ लाभली आहे, प्रदीप मुळ्ये यांनी केलेलं नेपथ्य हे एक जमेची बाजू, प्रकाश योजना किशोर इंगळे यांची तर गुरु ठाकूर यांच्या गीताला अशोक पत्की यांचे मधुर संगीत लाभले आहे.गंभीर विषयांवरील खळाळून आनंद देणारे हे नाटक " जगा जीवन सकारात्मकतेने " असा संदेश देते.

Tag:
Back to Top