BREAKING NEWS

आमदार हेमंत पाटील यांनी महावितरणच्या अधिका-यांना घेतले फैलावर

BY   Posted On : 22 Apr 2017 399

नांदेड दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गावातील विजेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा तसेच जे कर्मचारी या कामात दिरंगाई करतील त्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात आमदार हेमंत पाटील यांनी महावितरणच्या अधिका-यांना फैलावर घेतले. दोन महिन्या पासून गैरहजर असलेले सोनखेड येथील लाईमैन राजाभाऊ अटकोरे यांच्यावर जागेवरच निलंबनाची कार्यवाही अधीक्षक अभियंता आर.आर. यांनी केली.

महावितरणच्या तरोडा नाका, मेजर स्टोअर येथे आमदार हेमंत पाटील यांच्या आध्य्क्षेतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी अधीक्षक अभियंता आर.आर.कांबळे,किरणआंबेकर,तहसीलदार,नांदेड,उषाकिरणश्रुंगारे,तहसीलदार,लोहा,ए.एस.दासरकर, कार्यकारी अभियंता,जे.जे.चौधरी,कार्यकारी अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत आमदार हेमंत पाटील यांनी सर्वप्रथम प्रत्येक गावातून आलेल्या सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फ़त गावातील विजेच्या समस्या एैकून घेतल्या. त्यानंतर गावनिहाय महावितरणच्या अधिका-यांकडून संबधित गावाचे समस्येचे निराकरण करण्यात आले.

त्यानंतर आमदार हेमंत पाटील संवाद साधतांना म्हणाले की, सध्याच्या दैनंदिन जीवनात वीज ही अत्यावश्यक बाब असून महावितरणच्या अधिका-यांनी याबाबत कार्यतत्पर असणे गरजेचे आहे. बहुतेक गावातून विजेचे खांब, रोहीत्री आणि जुन्या तारा लोंबकळत असलेल्या समस्या प्रामुख्याने समोर आल्या या समस्या लवकरात-लवकर निकाली लावाव्यात तसेच माझ्या मतदार संघातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना ‘पंडित दिन दयाल ग्रामज्योत’ योजने अंतर्गत त्वरित लाभ देण्यात यावेत. या योजने अंतर्गत एकही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी भविष्यात वंचित राहू नये यासाठी महावितरण विभागाने आपल्याकडे सुरु असलेल्या योजनांचे परिपत्रक काढून प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात यावेत अशा सूचना देखील आमदार हेमंत पाटील यांनी दिल्या.यावेळी पी.पी. फंजेवाड, गट विकास अधिकारी,लोहा, एम.के.ठाकरे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता, एन.डी.लोन, उप-कार्यकारी अभियंता, एस.डी. सोनसळे, साहाय्यक अभियंता, पी.आर.मुपिडवार, सहाय्यक अभियंता, पी.आर.थोरात, सहाय्यक अभियंता, एस.के.कसनाळे, सहाय्यक अभियंता, एस.डी.कोळपे, सहाय्यक अभियंता, एस.टी.शेटवाड, विस्तार अधिकारी यांच्यासह प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tag:
Back to Top