BREAKING NEWS

गुरुव्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ.तारासिंघ विरुध्द भ्रष्टाचाराची चौकशी करणार समिती

आज पासून अध्यक्ष शेरसिंघ फौजी

BY   Posted On : 22 Apr 2017 380

आज गुरुव्दारा बोर्डाच्या 11 सदस्यांनी नांदेडमध्ये बैठक बोलावून आमदार तारासिंघ यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द चौकशी समिती स्थापन केली आणि जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येणार नाही तोपर्यंत गुरुव्दारा बोर्ड अध्यक्ष पदावर शेरसिंघ फौजी काम करतील, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला व्यवस्थापकीय समितीचे तीन सदस्य उपस्थित होते.

गुरुव्दारा बोर्डाचे अध्यक्ष तारासिंघ यांनी 10 एप्रिल रोजी गुरुव्दारा बोर्डाची एक बैठक मुंबईमध्ये आयोजित केली होती. त्या बैठकीस फक्त सहा जण हजार होते. हा बैठकीचा कोरम पूर्ण झाला नसताना सदस्यांनी गुरुव्दारा बोर्ड कायदा 1956 च्या कलम 15 मधील तरतुदीनुसार आपल्या अखत्यारित आज नांदेडमध्ये बैठक बोलाविली. या बैठकीला नांदेड येथील शेरसिंघ फौजी, सुरेंद्रसिंघ अजायबसिंघ, परमज्योतसिंघ चाहेल, राजेंद्रसिंघ पुजारी, गुरमितसिंघ महाजन, रणजितसिंघ कामठेकर, मुंबई येथील सरदार भुपेंद्रसिंघ मिन्हाज, बाबा गुरविंदरसिंघ, पंजाब येथील अवतारसिंघ मक्कर, इंदौरचे कुलदीपसिंघ भाटीया आणि कर्नाल हरियाणाचे रघुजितसिंघ वीर्क हजर होते. सोबतच व्यवस्थापकीय समितीचे सदस्य सरदार नौनिहालसिंघ जहागिरदार, रविंद्रसिंघ बुंगई आणि गुलाबसिंघ कंधारवाले असे सदस्य उपस्थित होते. आमदार तारासिंघ आणि इतर पाच सदस्य अनुपस्थित होते.

१० एप्रिल रोजी मुंबई येथे आ. तारासिंघ यांनी सहा सदस्यांसह घेतलेली बैठक पूर्णपणे रद्द ठरविली. सोबतच नांदेडमधील शिक्षण समितीचे अध्यक्ष सरदार अमरीकसिंघ वासरीकर यांना त्या पदावरुन काढून राजेंद्रसिंघ पुजारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. अमरीकसिंघ वासरीकर हे सध्या गुरुद्वारा बोराच्या सदस्यांसह नांदेड जिल्हा सरकार अभियोक्ता या पदावर सुद्धा कार्यरत आहेत. सोबतच आमदार तारासिंघ यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सरदार शेरसिंघ फौजी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन करण्यात आले आहे. त्यात इतर चार सदस्य असतील. ही समिती आमदार तारासिंघ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन आपला अहवाल बोर्डाला सादर करील. तोपर्यंत आमदार तारासिंघ हे या गुरुव्दारा बोर्ड समितीचे अध्यक्ष राहणार नाहीत. त्यांच्या जागी अध्यक्ष पदाचा कार्यभार सरदार शेरसिंघ फौजी यांच्याकडे राहील. ही सर्व माहिती या समितीमध्ये हजर असलेले व्यवस्थापकीय समितीचे सदस्य सरदार नौनिहालसिंघ जहागिरदार यांनी दिली.

Tag:
Back to Top