BREAKING NEWS

गणेश मोरतळे यांचे अल्पशा आजाराने निधन

BY   Posted On : 22 Apr 2017 200

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विशेष कक्षातील अधिक्षक गणेश दत्तात्रय मोरतळे (५०) यांचे सोमवारी दुपारी ४.३० वाजता अल्पशा आजाराने हैद्राबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. आज मंगळवारी सकाळी ११.३० वाजता हंडरगुळी (हाळी बाजार) ता. उदगीर या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या त्यांच्या आकस्मित निधनाबद्दल सर्व अधिकारी. प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, २ भाऊ, बहीण, पत्नी, १ मुलगी व १ मुलगा असा मोठा परिवार आहे.

Tag:
Back to Top