BREAKING NEWS

जुना मोंढा मारहाण प्रकरणातील एकाला दोन दिवस पोलीस कोठडी

BY   Posted On : 22 Apr 2017 597

जुनामोंढा भागातील इच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ होळीच्या दिवशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी झालेल्या हाणामारीतील एक आरोपी पोलिसांनी 17 एप्रिल रोजी पकडला. आज तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दि.27 मार्च 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान जुनामोंढा भागातील इच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ दोन गटात तलवार, खंजर, काठ्या आदींनी मारहाण झाली. या लोकांमध्ये पहिला वाद होळीच्या दिवशी झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी 27 मार्च रोजी पुन्हा भांडण झाले. या हाणामारीत दोन्ही गटाच्या लोकांविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न या सदराखाली इतवारा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते.

या प्रकरणी सुंदर नंदलाल यादव यांच्या तक्रारीवरुन चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यातील बजरंग उर्फ राधेश्याम अंकुशराव कुंडगीर (22) हा उपचार घेत होता. 17 एप्रिल रोजी दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्यास पकडले. आज तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तपासाची गरज म्हणून पकडलेल्या बजरंग कुंडगीरला दोन दिवस, 20 एप्रिल 2017 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ऍड.म.रजियोद्दीन असिफोद्दीन यांनी बाजू मांडली.

Tag:
Back to Top