BREAKING NEWS

अमेरिका सेंट लुईसस्थित शास्‍त्रज्ञ डॉ. सतीश धोंडे रमले जून्‍याआठवणीत

वर्गमित्रांनी केला ह्रदय सत्‍कार

BY   Posted On : 22 Apr 2017 205

आपला वर्गमित्र अमेरिका एका नामांकीत कंपनीत ...वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ... तो परत जन्‍मभूमीत आला.... याचा आनंद व अभिमान मित्रांना झाला.. .शालेय जीवनातील ...अनेक प्रसंग.. किस्‍से.. आठवणींना उजाळा.. देत मित्रपरिवारांनी ....डॉ. सतीश गुरुअप्‍पा धोंडे (पेनूर) यांचा ह्रदय सत्‍कार केला.. मित्रांच्‍या प्रेमाचे ओझे ..सतीशला पेलताना. ..अश्रु दाटून आले ..... जिज्ञासा ' मध्‍ये विद्यार्थ्‍यांना करिअर तुम्‍हीच ठरवा..... आणि तुम्‍हीच घडवू.... शकता.असे स्‍वानुभव सांगितला..... निमित होते मित्रांच्‍या स्‍नेह सत्‍काराचे !

पेनूरचे भूमिपूत्र आणि लोह्याच्‍या मातीत घडलेले डॉ. सतीश गुरुअप्‍पा धोंडे हे अमेरिकेतील सेंट लुईस शहरात एका नामांकित कंपनीत वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ आहेत. लोह्याच्या 'जिज्ञासा अभ्‍यासिकेत 'त्‍यांचा ह्रदय सत्‍कार करण्‍यात आला .गुरुवर्य स्‍व. अशोक किलजे यांचे विद्यार्थी आहेत. माजी नगराध्‍यक्ष किरण वट्टमवार, बालरोग तज्ञ डॉ. शैलेश किलजे यांच्‍या हस्‍ते खारीक खोब-याचा हार घालून ह्रदय सत्‍कार करण्‍यात आला. राज्‍य पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षक मित्र काशीनाथ शिरसीकर व संजय पारसेवार या मित्रांमुळे हा अविस्‍मरणीय स्‍नेहमेळा घडून आला. डॉ. सतीश धोंडे यांनी काका भद्रुअप्‍पा धोंडे व काकीअरुणाताई यांच्‍यामूळेच आपण घडलो सांगितले . अमेरिकेत वाहतुकीसह सर्वाजनिक ठिकाणी नियम शिस्‍त बाळवी लागते हे सांगितले हुशारी ला महत्व आहे .वर्ण भेद कमालीचा आहे.जून्‍या शालेय आठवणी मित्रासोबत त्यानी शेअर केल्या. ....प्रसंग सांगितले व जिज्ञासा च्‍या विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. माजी नगराध्‍यक्ष किरण वट्टमवार यांनी गुरुअप्‍पा धोंडे , भद्रुअप्‍पा धोंडे या बंधूच्‍या कौटूंबिक शैक्षाणिक प्रगतीचा गौरव केला सतीशच्या यशाचे कौतुक केले.

प्रास्‍ताविक हरिहर धुतमल यांनी तर काशीनाथ शिरसीकर यांनी सत्‍कारा मागची भूमिका मांडली. बालाजी पाटील कळकेकर यांनी मित्रांच्‍या आठवणी सांगितल्‍या खाजामिया शेख यांनातर अश्रु आवरता आले नाही. अविस्‍मरणीय सोहळयाला बालाजी कळकेकर, संजय पारसेवार, बाबु डिकळे, रत्‍नाकर उतरवार, संजय बिडवई, प्रा. माधव केंद्रे, संग्राम आईनवाडीकर, प्रकाश जिरेवार, लक्ष्‍मीकांत कोटलवार बनवसकर, किरण कोटगीरे, केशव धाडके, विनोद महाबळे, शिवाजी पांचाळ, युनूस शेख, बालाजी ढवळे, मुकेश ढगे यासह मित्रपरिवार उप‍स्थितीत होता. संचलन काशीनाथ शिरसीकर व आभार प्रशांत मोटरवार यांनी माडले.

Tag:
Back to Top