BREAKING NEWS

पोलीस सेवेतून बडतर्फ हवालदार वारपडेला मिळाला अटकपूर्व जामीन

BY   Posted On : 22 Apr 2017 409

बडतर्फ पोलीस हवालदार उत्तम वरपडे यास विशेष जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी ऍट्रासिटी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आणि नंतर माहूर पोलिसद ठाण्यात बदली आणि नांदेड निलंबन आणि सध्या सेवेतून बडतर्फ पोलीस हवालदार उत्तम शंकरराव वरपडे यांच्याविरुध्द नितीन पांडूरंग पल्लेवाड (वय-27) या बाचोटी येथील रहिवाशी युवकाने 4 एप्रिल 2017 रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.उत्तम शंकरराव वरपडे हा सुद्धा बाचोटी गावातील रहिवाशी आहे. त्या तक्रारीनुसार उत्तम वरपडेने त्यास 14 एप्रिल 2016 रोजी म्हणजे जवळपास एक वर्षा अगोदर मारहाण करुन त्याच्या खिशातील मोबाईल, डेबिटकॉर्ड आणि 1 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली होती. तक्रार देणारा युवक अनुसूचित जमातीचा असल्याने वजिराबाद येथे उत्तम शंकरराव वरपडे विरुध्द भादविच्या कलम 392,342, 294, 323, 504, 506 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015च्या कलम 3 (आय) (आर)(एस)प्रमाणे गुन्हा क्रमांक 110/2017 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक आशेक बनकर यांच्याकडे देण्यात आला.

आपल्या विरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तम वरपडे यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळावा असा अर्ज केला. त्यावर झालेल्या सुनावणीत उत्तम वरपडे यांचे वकिल ऍड.रमेश परळकर यांनी न्यायालयाला सांगितले की, घटनेची तक्रारी देण्यामध्ये 1 वर्षाचा उशीर झालेला आहे. आणि हा उशीर पूर्णपणे तक्रारारीत लिहिलेला नाही. तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार घडलेली घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 18 प्रमाणे जामीन नाकारता येणार नाही.

आज दि.19 एप्रिल रोजी उत्तम शंकरराव वरपडे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर न्यायाधिश हरीभाऊ वाघमारे यांनी निकाल देतांना या प्रकरणात तक्रार द्यायला झालेला उशीर योग्य पध्दतीने तक्रारीरीत सांगितलेला नाही आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 18 प्रमाणे अटक पूर्व जामिन मिळणार नाही,हा मुद्दा सदरची घटना सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. म्हणून उत्तम शंकरराव वरपडेला अटकपूर्व जामिन न्या हरिभाऊ वाघमारे यांनी मंजूर केला आहे अशी माहिती ऍड. रमेश परळकर यांनी दिली.

Tag:
Back to Top