BREAKING NEWS

जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील माहिती अधिकाऱ्यास माहिती आयुक्तांचा दणका

BY   Posted On : 22 Apr 2017 286

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्या प्रकरणी तीन हजार रुपये नुकसानभरपाई माहिती मागणाऱ्याला देण्याचे आदेश माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी जारी केले आहेत.

नांदेड येथील जगदीपसिंघ नंबरदार यांनी भूमी अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्याकडे भूमापन क्र.16359 मध्ये झालेला फेरफार क्र.5515 या संचिकेची माहिती मागितली. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय नांदेड यांनी ही माहिती दिली नाही. म्हणून नंबरदार यांनी औरंगाबादच्या माहिती आयोग कार्यालयात दुसरे अपिल दाखल केले. याबाबत झालेल्या सुनावणी दरम्यान जनमाहिती अधिकारी तथा मुख्यालय सहायक उपअधीक्षक भूमीअभिलेख एस.बी.कालेवाड हे उपस्थित होते. प्रथम माहिती अधिकारी तुकाराम जरग हे अनुपस्थित होते. या प्रकरणात राज्य माहिती आयोगाने माहिती अधिकार कायद्यातील असलेल्या तरतुदींचा उल्लेख करणारे वर्तन करणारे ठरले असे आपल्या आदेशात लिहिले. सध्या असलेले जनमाहिती अधिकारी शेख यांनी सुध्दा कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना 25 हजार रुपयांचा दंड का करण्यात येऊ नये, अशी नोटीस जारी केली आहे. त्याचे उत्तर तीस दिवसात देणे बंधनकारक आहे.

भूमीअभिलेख कार्यालयातील माहिती अधिकारी तुकाराम जरग यांनी भविष्यात अशा प्रकारचा नियमांचा भंग होणार नाही म्हणून माहिती अधिकार कायद्यात माहिती मागणाऱ्याला नुकसान भरपाई देण्याचया तरतुदीनुसार तुकाराम जरग यांनी तीन हजार रुपये रोख रक्कम नुकसान भरपाई म्हणून जगदीपसिंघ नंबरदार यांना द्यावेत, असे आदेश केले आहेत. तीन हजार रुपये ही रक्कम जनमाहिती अधिकारी व सहायक जनमाहिती अधिकारी भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या वेतनातून कपात करुन पंधरा दिवसात धनादेशाव्दारे जगदीपसिंघ नंबरदार यांना देण्यात यावेत, तसेच त्यांनी मागितलेली माहिती विनामूल्य तीस दिवसात उपलब्ध करुन द्यावी, असेही माहिती आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Tag:
Back to Top