BREAKING NEWS

नांदेड जिल्ह्यात नवीन आलेल्या 13 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नियुक्त्या आणि एकाला मिळाले पोलीस ठाणे

आणि एकाला मिळाले पोलीस ठाणे

BY   Posted On : 22 Apr 2017 616

नांदेड जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या 13 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आहेत. तसेच एक जुन्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या नियत्रंण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक नामेदव शिवाजी मद्ये यांना मरखेल पोलीस ठाण्यात पुढील आदेशापर्यंत तैनातीवर नियुक्ती देण्यात आली आहे.

तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलात 13 सहाय्यक पोलीस निरिक्षक दाखल झाले आहेत. त्यातील काहीजण नांदेड जिल्ह्यातच पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते. या नवीन 13 जणांना पुढीलप्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे. सुनिल राजाभाऊ बडे (वजिराबाद पोलीस ठाणे), नितीन अप्पासाहेब खंडागळे(मुदखेड), सालारखान करीम खान पठाण(शिवाजीनगर), प्रल्हाद भानुदास गिते (देगलूर), पांडूरंग दिगंबर भारती(स्थानिक गुन्हे शाखा), सोमनाथ वसंत शिंदे(बिलोली), रविंद्र गोवर्धण सांगळे (भाग्यनगर), अरुण भद्रीप्रसाद नागरे(प्रशिक्षण प्रभारी), राजेंद्र केेशवराव मुंढे (पोलीस कल्याण), सुरेश वसंतराव भाले (भोकर), अमोल दिनकर धस(लोहा), दिलीप सुखदेवराव इंगळे (नायगाव), रामकिशन तुकाराम नांदगावकर(कंधार). नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपूरे यांनी 18 एप्रिलच्या सायंकाळी हे आदेश जारी केले आहेत. सर्व सहाय्यक पोलीस निरिक्षकांना तात्काळ नियुक्ती दिलेल्या जागी हजर होवून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Tag:
Back to Top