BREAKING NEWS

भगतसिंघ रस्त्याचे निवेदन देणाऱ्या लोकांनी पोलीस अधीक्षकांसमोर स्वागत कक्षात मांडली व्यथा

BY   Posted On : 22 Apr 2017 208

शहराच्या भगतसिंघ रस्त्यावर राहणाऱ्या अनेक घरातील लोक स्वच्छ आणि सुंदर नांदेड मध्ये या रस्त्यावरून जाणे येणे करणाऱ्या बेकायदा मोठ्या वाहनांच्या मुळे स्वासांच्या विकारांनी ग्रासले आहेत.या चारचाकी वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलेल्या संदीपसिंघ याना एका विद्वान सहायक पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना भेटण्यात मोठे अडथळे आणले.यावर सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना कसे भेटावे असा प्रश्न संदीपसिंघ यांना पडला होता.

शहराच्या भगतसिंघ रस्त्यावर अनेकांची घरे आहेत.याच रस्त्यावरून अनेक ट्रॅव्हल्स गाड्या,बस आणि ट्रक जेणे जाणे करतात.या सुंदर नांदेड मधील भगतसिंघ रस्त्याची दुरावस्था पाहिल्यास एखाद्या अत्यंत छोट्या गावातील रस्ताही या पेक्षा जास्त चांगला असेल असे वाटते.या गाड्यांच्या येणे जाणे करण्याच्या करण्याच्या अनेक फेऱ्यांमुळे या भागात धुळीचे साम्राज्य असते.ती धूळ नागरिकांच्या नाकावाटे पोटात जाते आणि स्वशन रोग अनेक नागरिकांना होत आहेत.सुंदर आणि स्वच्छ नांदेड असे सांगणारी महानगर पालिका या रस्त्याची दुरुस्ती करणार नाही हे माहित असल्याने या भागातील एक नागरिक संदीपसिंघ करमजीतसिंघ सिद्धू यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांच्या शहर प्रवेशा साठी जारी केलेल्या दिनांक 1 डिसेंबर 2006 आणि 22 मार्च 2012 या अधिसूचनांच्या छायाप्रती घेऊन निवेदन देण्यासाठी 17 मार्च 2017रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात एक विद्वान सहायक पोलीस निरीक्षक चौबे असे गृहस्थ आहेत.त्यांच्या मार्फतीनेच पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्याची प्रथा आहे.पण सन्माननीय चौबे यांनी संदीपसिंघ यांना पोलीस अधीक्षकांना भेटता येणार नाहीच अशी भूमिका सांगितली.पण पोलीस अधीक्षक यांना बेतून आपली व्यथा मांडण्यासाठी आलेले संदीपसिंघ आपल्या धेय्याकडे जाण्याचे निश्चितच करून आले होते. तेव्हा ते तळ मजल्यावरील स्वागत कक्षाजवळ थांबले.तेव्हा पोलीस अधीक्षक यांच्या सुरक्षा रक्षकाने तेथे येऊन असे रस्त्यात पोलीस अधीक्षकांना भेटता येणार नाही असे संदीपसिंघ यांना सांगितले.पण पोलीस अधीक्षक संजय येनपुरे हे आपल्या कार्यालयातून बाहेर निघत असतांना संदीपसिंघ यांनी त्यांच्या समक्ष जाऊन आदराने आपली व्यथा मांडली. संदीपसिंघ यांचे निवेदन घेऊन त्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिसूचना पाहून संजय येनपुरे यांनी ते निवेदन वाहतूक शाखेकडे पाठवले आहे. या बाबत संदीपसिंग सांगतात की,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिसूचना मध्ये अवजड वाहनांचा नांदेड शहरात प्रवेश विहित वेळेत करणे बंधनकारक आहे.ट्रॅव्हल्स आणि बस यांना जाण्यासाठी विहित रस्ता आहे.तरीपण त्याचे सर्रास उलंघन होते आहे.पोलीस अधीक्षक संजय येनपुरे या भगतसिंघ रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या त्रासावर जरुर लक्ष देतील असे त्यांना वाटते.

Tag:
Back to Top