BREAKING NEWS

दरोडेखोरांना पळवून लावणाऱ्या धाडसी महिलांचा पोलीस अधीक्षकांनी केला सन्मान

BY   Posted On : 22 Apr 2017 118

घरावर हल्ला करणाऱ्या साहसी महिलांचा नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी मासिक गुन्हे परिषदेत सन्मान केला.

दिनांक 27 मार्च 2017रोजी रात्री सिद्धिविनायक नगर वाडी (बु) आणि बालाजी नगर तरोडा (बु) येथे दोन घरांवर दरोडेखोरांनी हल्ला केला.या घरातील महिला सौ.अनिता पुंडलिक कंधारे आणि सौ.नीना कृष्णकुमार शर्मा या दोघीनी दरोडेखोरांना पिटाळून लावण्यात आले कसब पणाला लावले.आपल्या घरावर झालेला हल्ला परतवण्यासाठी या महिलांनी अनेक युक्त्या वापरल्या आणि त्यामुळे दरोडेखोरांना पळून जावे लागले.या साहसी कामाची दाखल घेत नांदेडच्या पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी काल दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या मासिक गुन्हा परिषदेत दोन्ही धाडसी महिलांचा सन्मान केला.या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,सर्व पोलीस उप अधीक्षक,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक आणि इतर सर्वच ठाणे प्रभारी अधिकारी हजर होते.

Tag:
Back to Top