BREAKING NEWS

आमदार प्रदीप नाईक व जिप उपाध्यक्षांच्या आक्षेपाने प्रतिनियुक्त्या रद्द!

मुळ पदास्थापने वर तिन दिवसात हजर राहण्याचे सिईओ चे आदेश!

BY   Posted On : 22 Apr 2017 136


माहुर(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या विविध विभागाती जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.अशांच्या प्रतिनियुक्त्या काल दि.03 (सोमवारी) मुख्यकार्यकारी अधिकारी शिंगारे यांनी रद्द केल्या.आमदार प्रदीप नाईक व जिपचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी पेसा अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बंजारा बहुल किनवट /माहुर तालक्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी व प्रतिनियुक्त्या रद्द करा अशी मागणी सभापती निवडीच्या पुर्व संध्येला मुख्यकार्यकारी अधिकारी जिप नांदेड यांच्या कडे केली होती.या मागणीची गंभीर दखल घेत सिईओ ने तात्काळ आदेश देत तिन दिवसात मुळ स्थापनेच्या ठिकाणी रुजु होण्याचे आदेश दिले आहे.

सोयी च्या ठिकाणी राहुन आदिवासी तालुक्याचा पगार घेणारे शिक्षण, आरोग्यसह जिप च्या विविध विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत.पेसा कायद्याच्या दंडकानुसार पेसा क्षेत्रातील गावात रिक्त अथवा प्रतिनियुक्तीवर कर्मचारी ठेवता येत नाही.तरी सुद्धा या दोन्ही तालुक्यात पेसा कायद्याची पायमल्ली करत अनेक प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या होत्या.परीनामी येथिल कार्यालयाच्या कामकाजावर विपरित परिणाम होउन नागरींकांची गैरसोय होत होती.या गंभीर विषयी आमदार नाईकांनी व जिपचे नुतन उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिंगारे यांचे लक्ष वेधून त्या नियुक्तया त्वरीत रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.यावर तातडीने निर्णय घेत सर्व प्रतिनियु क्त्या रद्द करण्याचे आदेश सिईओ ने काढले असुन तिन दिवसात मुळ पदास्थापने च्या ठिकाणी रुजु होण्याची तंबी हि देण्यात आली आहे.मुख्य कार्यकर्त्यांचा या आदेशाने जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत असुन राजकीय नेत्यांचा आश्रयाने पाठबळ मिळत असलेल्या या प्रतिनियुक्त्या बहाद्दरां पैकी कीती कर्मचारी नियुक्ततीच्या ठिकाणी हजर होतात यावर सदर च्या आदेशाचे फलीत दिसुन येईल.

Tag:
Back to Top