BREAKING NEWS

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

BY   Posted On : 22 Apr 2017 159

नांदेड(प्रतिनिधी)दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना तामसा ते भोकर रोडवर घडली.

दुचाकी क्र. एम.एच. 26 एक्स 0801 च्या चालकाने संजय माधवराव माने (30) रा. शिवपूरी ता. हदगाव यास धडक दिली. अपघात घडल्यानंतर दुचाकी चालकाने पलायन केले. जखमी संजय माने यास रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष माधवराव माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि गोमारे करीत आहेत.

Tag:
Back to Top