BREAKING NEWS

पत्रकार हल्ला विरोधी विधेयकाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून स्वागत

BY   Posted On : 22 Apr 2017 103

गत अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला पत्रकार हल्ला विरोधी विधेयक विधानसभेत बिनविरोध मंजुर करण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने बसस्थानकाजवळील राजासिंह चौकात फटाक्यांची फटाके  फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.तालुक्यातील पत्रकारांची शासकीय विश्रामगृह मुखेड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.गत अनेक वर्षापासून पत्रकार हल्ला विरोधी विधेयक मंजुर करावे यासाठी राज्यातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला होता. यासाठी जिल्हा, राज्यस्तरावर आंदोलने करण्यात आली. पत्रकारांच्या या एकजुटीचा विजय झाला असून दि.7 एप्रिल 2017 रोजी विधानसभेत पत्रकार हल्ला विरोधी विधेयक बिनविरोध मंजुर करण्यात आले. याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.  पत्रकार शिवाजी कोनापूरे. नामदेव यलकटवार,शेख रियाज व किशोर चौहाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकित महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव पास करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिवाजी कोनापूरे. नामदेव यलकटवार, शेख रियाज,मिलींद कांबळे,दत्तात्रय कांबळे, संजय पिल्लेवाड,  सादिक तांबोळी बा-हाळी, मोतीपाशा पाळेकर, बबलू मुल्ला, महेताब शेख, यांच्यासह किशोर चौहाण, सुशिल पत्की, संतोष बेळगे,शेखर पाटील, किशोर संगेवार, शिवकांत मठपती, राजेश बंडे,यशवंत बोडके, दादाराव आगलावे, कालिदास कुलकर्णी, संदिप कामशेट्टे, सुनिल पौळकर, आशिष कुलकर्णी, मुजिब शेख जांब बु.पत्रकार उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने  उपस्थित होते. दरम्यान बसस्थानकाजवळील राजासिंह चौकात फटाक्यांची आतिषबाजी करुन पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच पत्रकार संघटनेच्या एकजुटिचा विजय असो, महाराष्ट्र सरकारचे हार्दिक आभार अशा घोषणा देण्यात आल्या. या बैठकित महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव पास करण्यात आला.


Tag:
Back to Top