BREAKING NEWS

उन्हाळी कामांचे कागदावर आकडे घेऊन चालणार नाही - खा.अशोक चव्हाण

BY   Posted On : 22 Apr 2017 192

उन्हाळ्याचे दिवस आता केवळ दीड महिने राहिले असून जानेवारी-मार्च या महिन्यातील आराखड्याला अजूनही सुरूवात करण्यात आली नाही. काम करत असताना त्या कामाचा कालमर्यादा ठेऊन कामे करा केवळ चर्चा करून व कागदावर आकडे घेऊन चालणार नाही असे मत खा. अशोकराव चव्हाण यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत व्यक्त केले.

मुदखेड अर्धापूर तालुक्यातील संयुक्त पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी या भागाचे आ. अमिता चव्हाण, जि.प. अध्यक्षा शांताबाई निवृत्तीराव जवळगावकर, जि.प.समाजकल्याण सभापती सौ. शिला दिनेश निखाते, निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार अरविंद नरसीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा. नागेलीकर, मुदखेड पं.स.सभापती, जि.प. सदस्या सौ. अरूणा कल्याणे, सौ. सविता वारकड, बाळासाहेब देशमुख, सरपंच बालाजी मगरे यांच्यासह अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खा. चव्हाण यांनी दोन्ही तालुक्यातील टंचाईचा आढावा घेत असताना ते म्हणाले की, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामे रखडली आहेत त्या कामाचा निपटारा प्रामुख्याने करा याचबरोबर जानेवारी आणि मार्च या महिन्याचा आराखडा तयार झाला असला तरी यातील एकही काम अद्यापही सुरू झाले नाही आता दीड महिन्यांचा उन्हाळा शिल्लक राहिला असून आता टंचाईची कामे कधी सुरू करणार, पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अनेक कामे रखडली आहेत ज्याठिकाणी निधीअभावी कामे रखडली आहेत त्याची यादी तयार करा अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्याला दिल्या. या बैठकीत वाईच्या पाणीपुरवठा चांगलाच गाजला. 2012 मध्ये पाणीपुरवठा योजना मंजुरी मिळाली, गावातील अंतर्गत पाईपलाईन पूर्ण झाली विशेषत: करून या गावासाठी शासन स्तराववर 94 कामे मंजुर झाली. तर 67 कामे मार्गी लागली. उर्वरीत कामे ही गावातील भांडणामुळे होऊ शकले नाही याचा निपटारा लवकर करण्यात यावा व 2012 च्या पाणीपुरवठा योजनेचे काम गावपातळीवर होत नसले तर शासन स्तरावर करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर आमदूरा, मेंडका, माळकौठा, देवापूर, रोहिपिंपळगाव, रोहिपिंपळगाव तांडा, मगरे पिंपळगाव, बारड आदी गावातील सरपंचांनी पाणीटंचाईच्या बाबतीत आढावा मांडला.

रोहि पिंपळगाव तांड्यातील नागरिकांनी खा. अशोकराव चव्हाण व आ. चव्हाण यांच्यासमोर समस्यांचा पाडा वाचला. घरकुल योजनेअंतर्गत घरकुले मिळाली असून या गावातील 20 ते 25 लोकांना नवीन घरे मंजुर झाली त्यांनी जुने घरे पाडून नवीन घरांची कामे सुरू केली पण पहिलाच हप्ता मिळाली दुसरा हप्ता न मिळाल्याने या लोकांचे संसार उघड्यावर आहेत. बिडीओ यांना नमुना 8 नंबर नसल्यामुळे मंजुरी देत नाहीत याबाबत खा. चव्हाण यांनी याची स्वतंत्र बैठक लावली आहे. आमदूरा येथील 2014-15 तील पाणीपुरवठ्याचे काम ग्रामपंचायतमार्फत पुर्ण करण्यात आले. सदरील कामाचे बील जिल्हा परिषदेकडून अजूनही प्राप्त झाले नसून याबाबत जिल्हा परिषदेकडे चौकशी केली असता या कामाची संचीक गायब झाल्याचे समोर आले आहे. खा. चव्हाण यांनी याबैठकीत वीज वितरण कंपनी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना कामे वेळेत करा, झालेल्या कामांची फोटो काढून व त्याठिकाणाच्या सरपंचाची सही घेऊन त्याभागातील आमदारांच्या व्हॉट्सऍपवर पाठवा, काम करत असताना विशेष कालमर्यादा ठरवून काम करावे जेणेकरून ते काम वेळेत पूर्ण होईल नाहीतर याठिकाणी झालेली चर्चा व कागदावरील आकडे हे येथेच राहतील असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Tag:
Back to Top