BREAKING NEWS

भोकरच्या सेतू सुविधा केन्द्राचा परवाना रद्द करण्याची मतिमंद मुलाच्या पालकांची मागणी

आधारासाठी १०० रुपयाची होतेय मागणी

BY   Posted On : 22 Apr 2017 318

शासनाने नागरिकांना वेळत सुविधा मिळाव्यात या हेतूने राज्यामध्ये शहरासह ग्रामीण भागात सेतू सुविधा केंद्र उभारले आहे. परंतु याचा फायदा नागरिकांना होण्यापेक्षा सेतू सुविधा चालकाना होत असल्याचे चित्र भोकर तालुक्यात दिसत असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे मात्र भोकर तालुक्यातील जनता वैतागली असून, सेतू केंद्राची चौकशी करून परवाना रद्द करावा अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा आर्थिक कोंडीत सापडलेल्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकाने उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत सविस्तर असे कि दि.२३ मार्च २०१७ रोजी भोकर तालुक्यातील एका नागरिकाने आपल्या पत्नी सोबत मतिमंद मुलगा नरेनकुमार संतोष पुलकुंटवार याचे आधार कार्ड काढण्यासाठी भोकर शहरातील चव्हाण याचे महा -ई -सेतू सुविधा केंद्र गाठले हुते. येथे सायंकाळी पाच वाजता गेला आसता मतिमंद असलेला नरेनकुमार याचे आधार कार्ड काढण्यास वेळ लागत आसल्याने संबंधित पालकाने सेतू सुविधा केंद्र चालकास माझ्या मुलगा मतिमंद, जास्त वेळ थांबू शकत नाही. कृपया लवकर नामावर लावा म्हणून विनवणी केली. परंतु सेतू चालकाने समोरच्या रांगेतील व्यक्तीची परवानगी घ्या आसे सांगितले. शासनाच्या नियमानुसार अंपगासाठी ताबडतोब आधार काढण्याचे सक्त आदेश असताना आमच्याकडे अंपगासाठी कोणतेही सुविधा नाही. मुलाचा नोंदणी नंबर येईपर्यंत थांबावे लागेल आधार काढायचे आसेल तर थांबा नाहीतर घरी जा..? अशी आर्वच भाषा वापरली. तरीसुद्धा तक्रारकर्ते पालक याच ठिकाणी थांबून मुलाचा नोंदणी नंबर येई पर्यंत थांबले. दरम्यान दोन ते अडीच तासनंतर मुलाचा नोंदणीसाठी नंबर आल्याने संगणक समोर मतिमंद मुलास नेले. दरम्यान सेतू केंद्र चालकाने अपंग मुलास बसायला स्टूल किवा खुर्ची दिली नाही. उलट मुलाला त्रास होईल या स्थितीत उभे करून आधारसाठी प्रोसिजर पुर्ण केले. त्यानंतर सेतू सुविधा चालकाने शंभर रुपयेची मागणी केली. पण मी हे पैसे देऊ शकत नाही म्हंटल्यावर त्याने तक्रारकर्त्यासोबत वादावादी करत पैसे द्यावेच लागेल असं डाँ भरला. उगीच वाद कश्याला म्हणून शंभर रुपये दिले. एवढ्यावरच न थांबता सेतू केंद्र चालकाने मतिमंद मुलास व त्याच्या पालकांशी अपमानास्पद वागणूक दिली.

शासनाने सर्वांसाठी आधार सक्तीचे केले असून, त्याची अंमलबजावणी काटेकोर व्हावी यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्ह्णून काम करणाऱ्या चव्हाण ई सेतू सुविधा केन्द्रचालकाचे वर्तन माणुसकीला बगल देणारे आहे. अपंग व त्याच्या पालकांसोबत असा प्रकार करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या केंद्रचालची चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मतिमंद मुलाच्या वडिल संतोष नरसिंगराव पुलकुंटवार यानी उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याकडे एका निवेदनद्वारे दि. २९ मार्च २०१७ रोजी केली आहे. भोकर तालुका हा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री व विद्यमान खा. अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात अँनागना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यनागरिकांची काय गट असेल अश्या संतप्त प्रतिक्रिया भोकरवासियांतून उमटत आहेत. तक्रार देऊन दहा दिवस उलटली असताना प्रशासकीय अधिकारी याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलत नाही असा आरोप करत तक्रारदार व्यक्तीने सेतू केंद्रावरील कार्यवाहीसाठी आमरण उपोषणला बसण्याचा इशाराही दिला आहे.

Tag:
Back to Top