BREAKING NEWS

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 17 एप्रिल रोजी बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन

तक्रारी देण्याचे आवाहन

BY   Posted On : 22 Apr 2017 52

जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये चालू असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार सोमवार 17 एप्रिल 2017 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी , असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात सोमवार 17 एप्रिल 2017 रोजी दुपारी 4 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दो प्रतीत सादर करावे लागेल. या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.

सामाजिक समता सप्ताहात गुरुवारी
प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचे व्याख्यान
----------------------
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता "काल , आज आणि उद्या" या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचे व्याखान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे गुरुवार 13 एप्रिल 2017 रोजी सकाळी 11 वा. आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त जे. एम. शेख हे राहणार आहेत. नांदेडकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

Tag:
Back to Top