BREAKING NEWS

स्वारातीम विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांना पीएच.डी. पदवी प्रदान

BY   Posted On : 22 Apr 2017 95

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक सखारामजी कदम यांना विद्यापीठाने व्यवस्थापन विद्याशाखेतील व्यवस्थापन विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी आज मंगळवार दि.११ एप्रिल रोजी प्रदान करण्यात आली.
अशोक कदम यांनी संशोधक मार्गदर्शक डॉ.ए.व्ही. पळणीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ''स्टडी ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स ऑफ पब्लिक रिलेशन्स प्रॅक्टिसेस ऑफ सलेक्टेड प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मेडिया इन मराठवाडा रिजन'' या विषयावर विद्यापीठास प्रबंध सादर केला होता.

या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ.आर.एम. मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, मध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. वाणी लातूरकर, डॉ. केशव देशमुख, डॉ.डी.एम. खंदारे, उपकुलसचिव एम.एच. त्रिभुवन, व्ही. डी चालीकवार, डॉ. श्रीकांत अंधारे, मेघश्याम साळुंके, हुशारसिंग साबळे, प्रकाश कांबळे, कार्यकारी अभियंता अरुण पाटील, विधी अधिकारी भारत पाटील, सहाय्यक कुलसचिव डॉ. सविता यन्नावार, डॉ. डी. एम. तंगलवाड, पी.ए. कुलकर्णी, रामदास पेद्येवाड, दिलीप पाटील, उपअभियंता तानाजी हुस्सेकर, अरुण धाकडे, गोविंद हंबर्डे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आदींनी अभिनंदन केले.

Tag:
Back to Top