BREAKING NEWS

महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारातून प्रतिकुलतेवर मात करणारी खंबीर मानसिकता घडवा

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर

BY   Posted On : 22 Apr 2017 92

स्त्री आणि बहुजन शिक्षणाचे प्रणेते, शिवजयंतीचे जनक, शिवरायांचा प्रदीर्घ पोवाडा लिहिणारे आद्य शिवशाहीर, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनीच मरगळलेल्या समाजाला जगण्याचं आत्मभान व तरुणाईला उर्जा दिली आहे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगवी येथे आयोजित महात्मा जोतीबाराव फुले जयंती उत्सवात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी होते. अक्षय कोकाटे, रेखाताई मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विचारमंचावर प्रा. स्मिता गायकवाड, ज्योती देशमुख यांची उपस्थिती होती.

महात्मा जोतीराव फुले : विचार व कार्य या विषयावरील व्याख्यानात पुढे शिवाजीराजे पाटील बाभळीकर म्हणाले की, आजच्या युवकांनी प्रतिकुलतेवर मात करून काळाच्या पुढचा विचार करणारी खंबीर मानसिकता घडवण्याचा आदर्श महात्मा फुले यांच्या चरित्रातून घ्यावा. विधवा, स्त्रिया यांच्या उध्दारासोबतच अस्पृष्यता निवारणासाठी व तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजीवन लढा देणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारातून जातीभेद गाडून प्रगती साधून ज्ञानसंपन्न होण्याचे आवाहन इंजि. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवा पवार यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश देसाई यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Tag:
Back to Top