BREAKING NEWS

मोकासदरासह कहाळा प्रकरणातही ग्रामसेवकांवर मेहरनजर...!

नायगांव पंचायत समिती अंतर्गत चौकशा व कारवाया थंडावल्या....!

BY   Posted On : 22 Apr 2017 117

नायगांव बा. येथिल पंचायत समिती अंतर्गत मोकासदरा प्रकरणात त.मु.का.अ.पद्माकर केंद्रे यांना निलंबित झाल्यानंतरही मोकासदरासह कहाळा बु.व अनेक ग्रामपंचायतीमधिल गैरव्यवहारांच्या चौकशासह दोषींवर कारवाया जणू थंडावल्या असून दोषींवर मेहरनजर ठेवित संबधित विभाग स्वस्वार्थ साधित असल्याची चर्चा जोर धरत आहे.

प्राप्त माहितीनुसार पं.स.नायगांव (खै.)अंतर्गत ग्रामपंचायतीनिहाय योजनेनिहाय कामातील गैरव्यवहाराच्या बहुतांश तक्रारी आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती घेऊन पुराव्यानिशी अनेकांनी थेट राज्याच्या मंञालयापर्यंत तक्रारी करून अनेकदा उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.चक्क नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनावेळीही आंदोलनात्मक भूमिका घेतली. त्यामूळे वरिष्ठ स्तरावरून प्रकरणनिहाय चौकशांचेही आदेश प्राप्त झाले.माञ जिल्हा परिषद नांदेड व त्यांच्याच पंचायत विभागासह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एम.एस.चव्हाण व संबधितांनी अनेकदा योग्यतेने चौकशा करून घेत दोषींवर कठोर कारवाया केल्या नाहीत त्यामूळे अनेक तक्रारकर्ते संतप्त आहेतच परंतू,हंगरगा प्रकरणातील तक्रारकर्ता आर.टी.आय.कार्यकर्ता सिद्धार्थ गायकवाड यांना दोषी ग्रामसेवकाने आपल्या साथिदारांसह हल्ला केला तर,मोकासदरा प्रकरणात जिल्हा परिषदेचे त.मु.का.अ.पद्माकर केंद्रे यांच्यावर विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी निलंबित केले तरिही संबधित विभाग अद्याप कुंभकर्णी झोपेत असून आजपावेतो मोकासदरा प्रकरणातील दोषी निलंबित ग्रामसेवक एस.व्ही.कौशल्ये व एम.एम.बंडे यांच्यावर गैरव्यवहार प्रकरणात फौजदारी कारवाई नाही.

एवढेच नव्हेतर या प्रकरणातील कंञाटी व अन्य संबधीत कर्मचारी यांच्यावर साधी कारवाईही नाही. असाच प्रत्यय कहाळा बु.मध्येही येत आहे.ग्रामसेवक एम.बी.शिंदे यांना निलंबित केल्यानंतरही त्यांच्यावरही फौजदारी कारवाई नसून अन्य दोषींवर कोणतीच कारवाई नाही.हंगरगासह कांडाळा, औराळा, मरवाळी आदी अनेक गांवातील चौकशा कागदावरच आहेत. दरम्यान अनेक प्रकरणात समन्वय साधण्याऐवजी व दोषींवर योग्यतेने कारवायाऐवजी पं.स.व जि.प.प्रशासन कागदीमेळ जमवित असल्याने सुज्ञ नागरिकांतून संताप व्यक्त होत असून या पंचायत समितीत नविन महिला पदाधिकारीराज आल्याने त्यांच्या उदासिनतेसह त्यांचे प्रतिनिधींमूळे येथिल प्रकरणे सातत्याने चव्हाट्यावर येण्याचीच चिन्हे आहेत.

आत्ता आंदोलनाची तिव्रता वाढली..!
--------------------
महत्वाचे म्हणजे मोकासदरा,कहाळा बु.व हंगरगासह अनेक गांवातील प्रलंबित दोषींवरील कारवायासाठी प्रशासन उदासिन बनल्याने माहिती अधिकार तपास समिती,महाराष्ट्र पदाधिकारी आक्रमक बनले असून जिल्हाधिकारी कचेरीसमोर दि.12 एप्रिल पासून बेमुदत उपोषण व धरणे करणार आहेत तर,कहाळा बु.प्रकरणात दि.14 एप्रिल (भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी)रोजी नागेश कहाळेकर यांनी आत्मदहनाचा ईशारा दिला आहे.

Tag:
Back to Top