BREAKING NEWS

१०० टक्के विद्युतीकरणासाठी आ.हेमंत पाटील यांचा पुढाकार

१७ एप्रिल सोमवार रोजी महत्वपूर्ण बैठक

BY   Posted On : 22 Apr 2017 71

दक्षिण मतदार संघातील नांदेड लोहा आणि तालुक्यातील सर्व खेडीपाडी, वाड्या व वस्तीवर वीज पोहोचवण्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर कार्य हाती घेतले असून या अंतर्गत चर्चा करण्यासाठी हे काम त्वरेने मार्गी लावण्यासाठी १७ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजता पूर्णा रोड वरील मेजर स्टोअर येथे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महावितरणचे अधिकारी व संबधित तालुक्याचे तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात सर्व वाडी/तांडे गाव पाड्या आदी मध्ये विद्युतीकरण करण्यासाठी व स्वातंत्र्यपूर्व काळापासून या वाडी/तांड्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. तेथे वीज पोहोचविण्यासाठी शिवसेना आमदार हेमंत पाटील गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशिल आहेत. मंत्रालयातील मंत्री पातळीवर तसेच वरिष्ठ अधिकारी स्तरावर या बाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. आपल्या मतदार संघातील एकही गाव विजेविणा राहू नये असा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या १७ एप्रिल रोजी दुपारी दिड वाजता विज वितरण कंपनीच्या पूर्णा रोड वरील मेजर स्टोअर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महावितरणचे अधिक्षक अभियंता (इन्फ्रा) श्री.माधव मेहत्रे, नांदेड मंडळ श्री.आर.आर.कांबळे, वीज वितरणचे संबधीत अधिकारी, नांदेड तालुक्याचे तहसिलदार श्री.किरण अंबेकर, लोहा तालुक्याचे तहसिलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे व नांदेड तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री.घोलप व तालुक्याचे श्री.पी.पी.फंजेवाड उपस्थित राहणार आहेत. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सुचना केल्यानुसार या बैठकीला नांदेड व लोहा तालुक्यातील गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांनीही उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्याबाबत आदेशित केले आहे. आपला मतदार संघ पूर्णपणे विद्युतीकरण करण्यासाठी तसेच वाडी तांड्यावर पूर्णपणे विज पुरवठा व्हावा यासाठी हि बैठक महत्वाची मानली जाते. विजेचे खांब, विजेची जोडणी, रोहित्र उपलब्धता, खंडित होणारा विज पुरवठा, शेतीला होणारा विज पुरवठा या सर्व महत्वाच्या बाबीवर शिवसेना आमदार हेमंत पाटील सर्वांशी चर्चा करतील.

Tag:
Back to Top