BREAKING NEWS

नरसी सज्जाच्या तलाठ्याची बदली करा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु

BY   Posted On : 22 Apr 2017 245

मागील अनेक वर्षापासून नरसी सज्जाचा अतिरीक्त कारभार पहाणारे तलाठी विजय जाधव यांची तालुक्याबाहेर तात्काळ बदली करण्यात यावी या प्रमुख मागणीसह नायगांव तालुक्यातील मौजे मनुर, आंतरगाव, बरबडा, राहेर व सातेगाव येथील रेती धक्के त्वरित बंद करा आदी मागण्यांसाठी नायगांव तहसील कार्यालयासमोर ६ जनांनी अमरण उपोषण सुरुवात केली आहे.

तालुक्यातील सर्व रेती घाटावरुन महसुल बुडवत अवैध रेती उत्खनन करत परीसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे केले, मजुरांऐवजी जेसीबीने उत्खनन केले, सी.सी.टिव्ही कॅमेराचा वापर करणे बंधनकारक असताना सी.सी.टिव्ही कॅमेराचा वापर होत नसल्याचे दिसून येते. नरसी चौकात बैठे पथक स्थापन करा, संबंधीत मंडळअधिकारी, तलाठी आणि रेतीघाट लिलावधारक यांच्या संगणमताने आवश्यकतेपेक्षा जास्त वाळू उत्खनन करुन गोदापात्राची वाट लावली. त्यामुळे संबंधीतांवर गुन्हे नोंद करुन लिलावधारकांची नावे काळ्या यादीत टाकावेत व मागिल अनेक वर्षापासून नरसी येथेच ठाण मांडून रेती माफीयांना मदत करणारे तलाठी विजय जाधव यांची तत्काल तालुक्याच्या बाहेर बदली करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी कैलास तेलंग टेंभुर्णीकर, गोविंद टोकलवाड, सयद जाफर, गंगाधर गंगासागरे, गणेश कंदुर्के, विरेंद्र डोंगरे यांनी ११ एप्रिल पासून नायगावच्या तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

Tag:
Back to Top