BREAKING NEWS

डॉ.आंबेडकर जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात व्यसन मुक्ती कार्यक्रम साजरा

BY   Posted On : 22 Apr 2017 128

ग्रामीण रुग्णालय कंधार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती चे औचित्य साधुन दुपारी एक वाजता व्यसन मुक्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आज दुपारी 1 वाजता तरुणांना व्यसन मुक्ती कार्यक्रमा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार मयुर कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कंधार नगर परिषदेचे उपाध्यक्ष जफरोदिन हे होते.यावेळी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यशवंत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की,आजच्या घडीला व्यसनाधीनता वाढत चालली असुन व्यसन सोडणे ही काळाची गरज आहे.व्यसनांमुळे मनुष्याच्या आरोग्यास विविध रोग दडल्या जातात व माणसाचे आयुष्यमान कमी होते.नावयुवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत घेऊन या देशाची घटना लिहिली.त्यांच्यामुळे सर्व भारतातील लोकांना समानतेचा हक्क मिळाला.महिलांना स्त्री पुरुष समानतेचा अधिकार मिळाला.डॉ.बाबासाहेबांचे विचार भावी पिढी साठी व तरूणांनसाठी खुप मोलाचे आहेत ते विचार आत्मसाद करुन घेणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले यावेळी डॉ. साबळे व डॉ.गरुडकर म्याडम यांनी व्यसनाधीनता टाळण्यासाठी विविध उपाय सांगुन मार्गदशन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गुडमेवार यांनी केले या कार्यक्रमास दंतचिकित्सक डॉ.राहुल अन्नपुरे, डॉ.मुसांडे, डॉ.शाईन, डॉ.निखत, डॉ. रामेजवार म्याडम,डॉ.फिस्के,डॉ.लीना बनसोड,डॉ.मोरे,डॉ.लांडगे,औषध निर्माण अधिकारी शेळके बालाजी,कांबळे दिलीप,चिवडे शंकर, गित्ते, केंद्रे, वाघमारे आर,भोळे एबी,पी.एन पांचाळ,मिर्झा आर एम,कल्हाळे, रामगिरवार विजय,धोंडगे संजय, बौद्ध द्वार भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष नागेंद्र कांबळे,उपाध्यक्ष किरणकुमार कांबळे,सचिव विनोद कांबळे,मुंजेश कांबळे,व आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.

Tag:
Back to Top