BREAKING NEWS

प्रकल्प कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ - राजरत्न पवार

BY   Posted On : 22 Apr 2017 82

राज्यामध्ये नसून तर सबंध जगामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 एप्रिल हा दिवस हर्षोल्हासाने साजरा करण्यात येतो, परंतु एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांचे माहे फेब्रुवारी, मार्च या महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित अदा करावे, असे निवेदनाद्वारे मागासवर्गीय मंत्रालय कर्मचारी संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष राजरत्न पवार यांनी आदिवासी आयुक्तांकडेे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 5 एप्रिल 2017 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णय झाला. त्याच निर्णयाचा आधार घेत दि. 7 एप्रिल रोजी आदिवासी विभागाच्या वतीने सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यासाठी आदेशित करण्यात आले. परंतु कुठलाही उत्सव साजरा करीत असताना कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन वेळीच मिळालं नाही तर सप्ताह साजरे कसे करायचे.

सदरील प्रश्न मागील दोन महिन्यांपासून प्रलंबित असून प्रकल्प कार्यालयाच्या संबंधित प्रमुखास संघटनेच्या वतीने विचारना केली असता उडवा उडवीचे उत्तर देऊन संघटनेची दिशाभूल केली जात आहे. तरी सदरील प्रकरणी प्रकल्प अधिकारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून 14 एप्रिलच्या अगोदर सर्व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन अदा करून प्रश्न निकाली काढावा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Tag:
Back to Top