BREAKING NEWS

जाधव सिस्टर्सच्या सुफी गायनाने धर्माबादकर मंत्रमुग्ध

कण-कण झिजे रमा, रमा भीमरावासाठी...

BY   Posted On : 22 Apr 2017 156

कण-कण झिजे रमा, रमा भीमरावासाठी... आले किती गेले किती पण नाही कुणी भीमावाणी... मै नागीण हूँ जयभीमवाली... जलवा हो जलवा भीम का या आणि अशा एकापेक्षा एक सरस सुफी आणि शास्त्रीय संगीताचा बाज असलेल्या अनेक बुद्धभीमगीतांच्या माध्यमातून नागपूर येथील विनया व विजया जाधव सिस्टर्सने धर्माबादकरांना मंत्रमुग्ध केले.

निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीचे येथील बाजार समितीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या संगीतमय मैफिलीच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड हे होते. तर तेलंगणा राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. सायलूदादा यांच्या हस्ते झाले. यावेळी धर्माबाद न.प.चे उपाध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, डॉ. व्ही.एल. परतवाड, सा.ना. भालेराव, एम.के. सिरसे, जि.प. सदस्य दत्तात्रय रेड्डी, नगरसेवक संजय पवार, नगरसेविका म्हादाबाई वाघमारे, बाजार समितीचे सचिव सी.डी.पाटील, वैभव देशमुख, सतीश पाटील, चंद्रकांत पाटील पांगरीकर, नायब तहसीलदार पी.पी. धुमाळे, आकाश रेड्डी, माजी नगरसेवक सुधाकर जाधव, विरप्पा मदनूरकर, विजय पाटील, जयराम पाटील, उपसभापती चंद्रकांत वाघमारे, जि.प. अधिकारी, कर्मचारी, भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. सुफी व शास्त्रीय गायनाने विविध राज्यात नावलौकीक केलेल्या जाधव सिस्टर्सने यावेळी विविध बुद्धभीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या सुरेश आवाजात आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एकापेक्षा एक सरस गीते सादर करून उपस्थित रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. याच कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीत आपले आयुष्य वेचलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी.एस. गवळे, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जी.पी. मिसाळे यांचा यावेळी सपत्निक हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीबाई मिसाळे, सुजाता गवळे, आर.पी. वाघमारे, गंगाधर सवई, पत्रकार शिवाजी राजूरकर, गौतम लंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख दत्ताहरी धोत्रे यांनी केले. जयंती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तुरेराव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आयोजक किशन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर पत्रकार जी.पी. मिसाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सीताराम सोनटक्के, सदानंद देवके, भगवान गायकवाड, चंद्रमुनी कांबळे, गणपत जटाळकर, गणेश वाघमारे, बंडू बैलकर, माधव पांगरीकर, विजयानंद बाभळीकर, नागेश धोत्रे, दयानंद भेरजे, जयभीम एडके, ऍड. विनोद धोत्रे, रत्नदीप धोत्रे, कु. सुविधा, स्विटी धोत्रे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tag:
Back to Top