BREAKING NEWS

बारड नगरीत हनुमान जयंती पालखी सोहळा उत्साहात संपन्न

BY   Posted On : 22 Apr 2017 58

बारड येथील गावकऱ्यांच्या वतीने हनुमान जयंती पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला असून राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की च्या गजरात रथावरून गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी झाले होते.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हनुमान मंदिर संस्थानच्या वतीने दि. 11 एप्रिल 2016 मंगळवारी हनुमान जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. पोलीस पाटील यशवंतराव लोमटे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करून दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ग्रामपंचायतच्या वतीने हनुमान पालखीचे पूजन उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सामूहिक महाआरती पूजा संस्थानचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोष वारकड, सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख, संस्थानचे उपाध्यक्ष प्रताप देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख माणिक लोमटे, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिगांबर टिपरसे, ग्रामपंचायत सदस्य किशोर देशमुख, नरसिंग आठवले, बालाजी लोनवडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

गावातील प्रमुख रस्त्यांवरून मशाल पेटवून रथावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजराज वारकरी भजनी मंडळाने पालखीची शोभा वाढविली. ठिकठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील हनुमान मंदिरात सूर्यलाड परिवार तसेच युवा मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शितलादेवी यात्रेतील भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद वाटपासाठी यादव लोमटे, किशोर पिल्लेवाड, सुरेश लोणवडे, मोहन सूर्यलाड, रमेश सूर्यलाड, अशोक सूर्यलाड, नामदेव सूर्यलाड, चेतन मुलंगे, सचिन लोमटे, संजय सूर्यलाड यांच्यासह आदींनी पुढाकार घेतला होता.

Tag:
Back to Top