BREAKING NEWS

कर्जमाफीसाठी आ. वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नरसी चौकात रास्तारोको

BY   Posted On : 22 Apr 2017 190

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे व शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी माजी पालकमंत्री आ.डि.पी.सावंत, आ.अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आज नरसीत दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले या रास्तारोको मुळे महामार्गावरील चारही रस्त्यावर वाहनांच्या रागांच रागां लागल्या होत्या .

कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यात काँग्रेस पक्ष वरचेवर आक्रमक होताना दिसत आहे. गेल्या ब-याच दिवसापासून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा म्हणून काँग्रेसने राज्यात आंदोलन करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे पण या भाजप सेनेच्या सरकारने या कडे दुर्लक्ष करीत असल्याने काल दि.१२ रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने नरसी चौकात सकाळी ११ वाजता आ.वसतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आ.वसतराव चव्हाण म्हणाले की हे सरकार नुसते आश्वासने देत आहे कृती मात्र शुन्य आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि शेती मालाला योग्य भाव द्या अशी मागणी करत आहोत पण हे सरकार लक्षात घेत नाही योग्य वेळ आली आम्ही काय ते करू असे सांगून मुख्यमंत्री वेळ मारून नेत आहेत. पण हेच मुख्यमंत्री आमचे सरकार असताना शेतकरी आत्महत्या या विषयावरून तत्कालीन मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यानंवर ३०२ चे गुन्हे दाखल कराअशी जोरदार मागणी करीत होते आता कुणावर ३०२ चि गुन्हा नोंद करावा असा सवाल उपस्थित केला. सोयाबीन ला पाच हजार रुपये भाव तर कापसाला सात हजार भाव द्या म्हणून मागणी करत होते पण आता तेच फडवणीस मुख्यमंत्री म्हणून काम पाहात मग्न आता का शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही ते शेतकऱ्यांसाठी काही करू शकत नाहीत हे यावरून तर दिसतच आहे या सरकारला खोटे बोलून सत्ता मिळवायची होती .युती सरकारच्या काळात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या तरी या सरकारला कर्ज माफीसाठी जाग येत नाही. काहीही झाले तरी आम्ही आमचे नेते माजी मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कर्ज माफिसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना एकत्रित करून आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितले .

रास्तारोकोत माजी पालकमंत्री आ.डि.पी.सावंत, आ.आमिताताई चव्हाण, जिल्हाध्यक्ष नागेलीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जिल्हा परिषदेचे सभापती मिसाळे, माजी शिक्षण सभापती व जि प सदस्य संजय बेळगे सौ. विजयाश्री कामठेवाड, संतोष वारकड, साहेबराव धनंगे, संभाजी पाटील भिलवंडे, भुजबळ, शिंदे, अटकोरे, काकडे, गणपतराव तिडके, पप्पू पा.कोडेकर, प्रा .पवार, बालाजी सुर्यतळे, अॅड. राम नाईक, बालाजी मदेवाड, श्रीनिवास चव्हान, अनिल कांबळे, सय्यद ईसाक आदींची उपस्थिती होती.

Tag:
Back to Top