BREAKING NEWS

उमरी ता.अर्धापूर येथे दोन युवकांचा डोळ्यात मिरचीची पूड टाकून खून

BY   Posted On : 22 Apr 2017 654

अर्धापूर तालुक्यातील उमरी येथे दोन तरुणांचा डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाकडाने व दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवार दि.13 रोजी उघडकीस आली असून यातील आरोपी शोधण्यासाठी पोलिसासमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

उमरी तालुका अर्धापूर येथील रहिवाशी कपिल सखाराम कांबळे (28) व त्याचा चुलत भाऊ प्रकाश निवृत्ती कांबळे (26) रा.शिरड शहापूर ता.औंढा हे दोघे दि.12 एप्रिल रोजी मोटारसायकल क्र.एमएच-12-डी.एफ-3701 वरुन जात असताना उमरी गावालगत स्मशानभूमी शेजारी त्यांचे मृतदेह आढळून आले. ही घटना दि.13 एप्रिल रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मृतदेहाजवळ मिरचीची पुड, लाकडी दांडे, रक्ताने माखलेले दगड व खाली पडलेली मोटारसायकल दिसून आली. ही माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, स्था.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक गुरम, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, श्र्वान पथक व अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोंगरे, सपोनि. दिपक दंतूलवार, पो.उप. निरीक्षक गणेश गायके, त्र्यंबक गायकवाड, फौजदार सोनाबाई कदम, जमादार देशमुख, पोहेकॉ. लोखंडे, कळके, प्रकाश कडदनवार, देशपांडे, कदम आदींनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. घटनास्थळ पंचनामा करुन प्रेत उतरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे पाठविले.

मयत कपिलचे वडील हे मुळचे वाघी, सिंधी ता.वसमत येथील असून ते उमरी ता.अर्धापूर येथे स्थायिक झाले होते. कपिल हा सुरुवातीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याचे गिरगाव ता.वसमत येथील सिमा कऱ्हाळे हिच्यासोबत संबंध ठेवून राहत होता. त्यास एक पाच वर्षाचा मुलगा आहे, अशी माहिती समोर आली आहे. दुसरा मयत प्रकाश हा शिरड शहापूर येथील रहिवाशी असून तो कपिलचा चुलत भाऊ आहे. तो मिस्त्री काम करीत असल्याने घरकुलाच्या बांधकामासाठी त्यास उमरी येथे आणले होते. कुशल कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत मयत कपिल व उमरी येथील ज्ञानेश्र्वर भालेराव यांच्यात 10 एप्रिल रोजी यात्रेच्या दिवशी सायंकाळी भांडण झाल्याने ज्ञानेश्र्वर भालेराव याच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस यंत्रणा कसून कामाला लागली आहे.

Tag:
Back to Top