BREAKING NEWS

जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलीस कोठडी

BY   Posted On : 22 Apr 2017 171

8 मार्च रोजी गल्लीत म्हशी उभ्या करण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडण प्रकरणातील एका गुन्हेगाराला तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

हुजेतबीन खालेद चाऊस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या वास्तव्याच्या गल्लीत म्हशी उभ्या करुन त्यांची घाण पसरविल्याप्रकरणी म्हशीच्या मालकांना सांगितल्यानंतर त्यांनी आणि इतर त्यांच्या तीन भावांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात हुजेतबीन खालेदसह इतर तिघांना जबर मार लागला. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी चार जणांविरुध्द भादंविच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.बी.आव्हाड यांच्याकडे दिला. या प्रकरणातील इतर तीन शेख कलीम शेख अहेमद, महंमद इरफान अहेमद आणि महंमद इशान अहेमद या तिघांना अगोदरच अटक झाली. सध्या हे तिघे तुरुंगात आहेत. आज इतवारा पोलिसांनी शेख उबेद अहेमद शेख निसार अहेमद या 22 वर्षीय युवकाला अटक करुन आणले. सरकारी वकील ऍड.महंमद रजियोद्दीन मोहंमद असिफोयोद्दीन यांनी पोलीस कोठडी देणे कसे संयुक्तीक आहे हा मुद्दा ग्राह्य मानून तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शेख उबेद अहेमदला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Tag:
Back to Top