BREAKING NEWS

लिंबगाव येथे बौद्धविहार सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन संपन्न

BY   Posted On : 22 Apr 2017 159

लिंबगाव येथे बौद्धविहार सांस्कृतिक भवनाचे उद्‌घाटन नांदेड उत्तरचे आ. डी.पी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आ.डी.पी. सावंत म्हणाले, की लिंबगाव गटामध्ये ज्याप्रमाणे भरघोष मतांनी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून दिले त्याप्रमाणेच त्यांना भरघोष निधी सुद्धा देण्यात येईल. डॉ. बाबासोब हे शिक्षणामुळे मोठे झाले, तेव्हा समाजाने व्यर्थ खर्च न करता आपल्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी. याप्रसंगी डॉ. दिनेश निखाते, जि.प. सदस्य साहेबराव धनगे, बंडू पावडे, सभापती सुखदेव जाधव, गोपाळराव कदम, उत्तमराव कदम, विठ्ठल पावडे, बालाजी सूर्यवंशी, सत्यजित भोसले, दीपक पाटील, प्रफुल्ल सावंत, चंद्रकांत बुक्तरे, प्रतापराव कदम, सरपंच उत्तमराव कदम, नाना पोहरे, बालाजी वाघमारे, चिंतामन पोहरे, नवनाथ कदम, भारत पोहरे, शेख शरीफ, रघुनाथ दुधमल, रोहिदास हिंगोले यांची उपस्थिती होती.

Tag:
Back to Top