BREAKING NEWS

माजी आ.माधवराव पाटील जवळगावकरांची भारतीय स्टेट बैंक शाखेला भेट

BY   Posted On : 22 Apr 2017 295

गत वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळण्यास अनंत अडचणी आल्या होत्या. हि बाब लक्षात घेऊन यंदाचा खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी जगाच्या पोशिंद्याला बैन्केने सहकार्य करावे अश्या सूचना माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी येथील भारतीय स्टेट बैंकेचे शाखाधिकारी अक्कुलवाड याना केल्या.

नुकतेच माजी आ.जवळगावकर यांच्या हिमायतनगर भेटीत अनेक शेतकरी, स्वस्त धान्य दुकानदारांना येणाऱ्या अडचणी व्यक्त केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केस भेट देऊन चालान भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, शाखेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वानवा, सुरक्षा गार्डची कमतरता, शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाबाबत येणाऱ्या अडचणी आदींबाबत शाखाधिकारी अक्कुलवाड यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. तसेच यावर तोडगा काढून शाखेसह शेतकरी, ग्राहक व नागरिकांचे हित जोपासण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे आणि शेतकरी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कर्जाची कपात करण्यात येऊ नये, कर्जदाराचे सेविंग खाते होल्ड करू नये, अश्या सूचना दिल्या. तसेच वरिष्ठ पातळीवर बैन्केला उद्भवणाऱ्या अडचनी बाबत शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून चैतू बाबत अडचणी दूर करण्यासाठी उमरखेड ऐवजी येथील भारतीय स्टेट बैन्केची शाखा नांदेडला जोडण्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांची भेट घेऊन प्रयत्न करण्याचे आश्वासनही जवळगावकर यांनी दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी शाखाधिकारी जैन यांच्याकडून ग्राहकांना सपत्नीक वागणूक मिळते, त्यांच्या पेक्षा एसबीएच शाखेचे अधिकारी चांगली वागणूक देतात असा सूरही काढला होता. जेष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, नगराध्यक्ष अ. अखिल अ.हमीद, विकास पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, शे.रहीम पटेल, रमेश कोमावार, रफिक सेठ, जोगेंद्र नरवाडे, दिलीप लोहरेकर, गोविंद बंडेवार, फेरोजखान युसूफखान, पंकज बंडेवार, आहद भाई, सदाशिव सातव, सरदार खान, प्रवीण कोमावार, राम मारुडवार, संजय माने, पापा पार्डीकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Tag:
Back to Top