BREAKING NEWS

पळसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

BY   Posted On : 22 Apr 2017 92

हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथे स्वातंत्र्य सैनिक बापुराव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी पं.स. सभापती सौ. सुनीता दवने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगासागर, सरपंच सौ. पार्वतीबाई भिसे, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम घंगाळे, पो.पा. काशीराव मस्के, चेअरमन विलास मस्के, नेहरू युवा प्रतिनिधी महेश राठोड, शंकर मुळे, डॉ. पिराजी पवार, वाचनालयाचे संचालक कुबेर राठोड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना विलास मस्के म्हणाले, बाबासाहेबांनी देशाची घटना, संविधान लिहिले त्यामध्ये देशातील सर्व नागरिकांना मानवाधिकार, अन्यायाविरूद्ध न्याय व हक्क मागण्याचा अधिकार दिला.

यावेळी गवातील नागरिक, महिला, युवक-युवती, वाचक, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे सदस्य, कोंडबा दवने, सोपान हापगुंडे, लक्ष्मीबाई भालेराव, दीपक पाटील, कांता चिंचोलकर, अशोक जाधव, देवराव कांबळे, हरिचंद आडे, योगेश राठोड, प्रसन्न आडे, कबीर कांबळे, भगवान घंगाळे, भाऊराव भिसे, जगदीश जोशी, संजय भिसे, चंपत घंगाळे, मारोती हंबरे, कामाजी लिमडगे, येलू मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर मुळे यांनी तर आभार डॉ. पिराजी पवार यांनी मानले.

Tag:
Back to Top