BREAKING NEWS

मुदखेडच्या आस्था आश्रमातील एक मुलगा झाला गायब

पोलिसांनी जारी केली शोध पत्रिका

BY   Posted On : 22 Apr 2017 162

आस्था वस्तीगृहातून शाळेत गेलेला ११ वर्षीय बालक दिनांक 29 मार्च 2017 पासून बेपत्ता झाला आहे.त्याचा शोध मुदखेड पोलीस घेत आहेत.या बाबत पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.

दिनांक 31 मार्च 2017 रोजी आस्था वसतिगृहाचे अधीक्षक शिवाजी कोंडीबा गुंटे यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 29 मार्च रोजी वस्तीगृहातील बालक रघुवीरसिंग रिंकूसिंग यास त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजेच्या सुमारास शाळेत सोडले. दुपारी 1 वाजता त्यास घेण्यासाठी गेले असतांना तो एक तास अगोदरच शाळेचे दप्तर घेऊन गेला असल्याचे सांगण्यात आले. त्यास कोणीतरी पळवून नेले असावे.या तक्रारीवरून मुदखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हाक्रमांक 78/2017 दाखल केला.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव भद्रे हे करित आहेत.

पोलिसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार पळवून नेलेल्या बालक रघुवीरसिंग रिंकूसिंगचे वय ११ वर्ष आहे.त्याची उंची 144 से.मी. आहे. त्याचा रंग निमगोरा आहे.केस बारीक आहेत.चेहरा गोल आहे.ब्लु टी शर्ट आणि जीन्स परिधान केलेली आहे. नाक सरळ आहे. त्याच्या उजव्या डोळ्याखाली मार लागलेले निशाण आहे. मुदखेड पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की,शोध पत्रिकेतील वर्णनाचा हा बालक कोणास दिसला तर त्यांनी मुदखेड पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी.तसेच मुदखेड पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांक 02462 275533 आणि पोलीस निरीक्षक एस.एस.आम्ले यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9823144286 आणि भीमराव भद्रे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9823308043 वर माहिती देता येऊ शकेल.

Tag:
Back to Top