BREAKING NEWS

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे याना निरोप

BY   Posted On : 22 Apr 2017 99

येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे हे 30 मार्च 2017 रोजी सेवानिवृत्त झाल्याने, किनवट पोलीस स्टेशनतर्फे शुक्रवारी (दि.14) एका छोटेखानी समारंभात त्यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.एस.चौधरी व पोलीस निरीक्षक डॉ.अरूण जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहा.फौजदार विजय कांबळे हे दि.01 ऑक्टोबर 1983 रोजी पोलीस दलात रूजू झाले होेते. नांदेड, लोहा, इस्लापूर व किनवट येथे त्यांचा कार्यकाळ व्यतीत झाला. 33 वर्ष 6 महिने कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावल्यानंतर ते किनवट येथे सेवानिवृत्त झाले. त्यांची प्रामाणिकता व अहोरात्र बिनतक्रार कार्यतत्परतेबद्दलची प्रशंसा पोलीस उपविभागीय अधिकारी चौधरी यांनी त्यांच्या गौरवार्थ केलेल्या मनोगतात व्यक्त केली. याप्रसंगी पो.उपनिरीक्षक कायंदे, वडारे, बनसोडे, पो.हेड कॉन्स्टेबल गीते, सावंत, पांढरे, पोलीस नायक शेख शकील, भगत, वाहतूक पोलीस चौधरी, गृहरक्षक दलाचे संजय, माने, सय्यद फिरोज अली आदींची उपस्थिती होती.

Tag:
Back to Top