BREAKING NEWS

आ. वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत डिजीधन मेळावा

BY   Posted On : 22 Apr 2017 146

नोटाबंदीनंतर देशात व राज्यात मोठा बदल होत असून शासनस्तरावरुन रोख व्यवहाराऐवजी कँशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. देशात कॅशलेस व्यवहारात वाढ व्हावी म्हणून सरकार प्रयत्न करीत असून. भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नायगाव तहसिल कार्यालयामध्ये आ. वसंतराव चव्हाण व तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या उपस्थितीत डिजीधन मेळावा घेण्यात आला. व कँशलेस व्यावहाराबद्द सखोल माहीती देण्यात आली.

देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने देशात प्रचंड उलथापालथ झाली. सर्वत्र हाहाकार उडाला एका रात्रीत जुन्या नोटा कागज का टुकडा झाल्या. या ऐतिहासिक निर्णयानंतर देशात कँशलेस कारभार वाढवण्यासाठीही प्रयत्न होवू लागले बँकांनी पुढाकार घेवून कँशलेस व्यवहारासाठी नागरिकांना प्रशिक्षण देण्या बरोबरच डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व अन्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या असे शासनाचे धोरण ठरले आहे. केंद्रातील भाजप सरकारने देशातील भष्टाचार मुक्त करण्यासाठी कॅशलेस व्यवहार सुरू केले आहे. पण या कॅशलेस व्यवहाराल गती मिळत नसल्याने १४ एप्रिल हा दिवस भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये व्यापारी व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेऊन कॅशलेस व्यवहारा संबधी डिजीधन मेळावा घेण्यासंबधी शासनाकडून सुचना मिळाल्याने नायगाव तहसिलमध्ये शुक्रवारी भारतरत्न डाॅ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आल्यानंतर डिजीधन मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ.वसतराव चव्हाण हे होते तर नायगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.सुरेखा पंढरीनाथ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी व्यापाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कॅशलेस व्यवहार सर्वासाठी चांगले आहे पण आम्हाला बॅकेचे अधिकारी या संदर्भात मदत करत नाहीत त्यामुळे आम्हाला हा व्यवहार करण्यासाठी आनेक आडचणी येत असल्याचे सांगितले. डिजीधन मेळाव्यात प्रस्तावित करताना तहसीलदार काशीनाथ म्हणाले की देशात व राज्यातील भष्टाचार मुक्त व्हावा या उद्देशाने सरकारने कॅशलेस व्यवहार व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्या आनुषगाने डिजीधन मेळावा आम्ही घेत आहेत. व्यापारी व स्वस्त धान्य दुकानदारांनी तालुक्यात कॅशलेश व्यवहार वाढावा यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

यावेळी आ.चव्हाण म्हणाले की कॅशलेस व्यवहार सर्वासाठी फायद्याचे आहे. या कॅशलेस व्यवहाराला तालुक्यात गती मिळाली पाहिजे यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे सांगत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. मागील आठवडय़ात तहसील प्रशासनाच्या वतीने " कॅशलेस व्यवहार" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत नायगाव येथील कन्या शाळेतील कु.शितल जंगले प्रथम तर कु.मोनिका व्यंकटराव भुताळे ही द्वितीय, कु.आफ्रीन साद शेख ही तीत्रीय, तर कु.अंजूम मेहबूबसाब शेख ही चौथा क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच तालुक्यातील स्वस्त दुकानदार यांना बायोमेट्रिक पध्दतीने धान्य वाटप करण्यासाठी मशीनचे वाटप तर काही व्यापाऱ्यांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी ही मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच देशाचे नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील दिशाभुमित हजर होते तेथील त्याचे झालेले भाषण स्क्रीनवर येथे दाखवण्यात आले. सदर कार्यकामास नायबतहसिलदार शंकर हांदेश्रर, पेशकार आलमवार, जाधव, पवार, मंडळधिकारी रमाकांत जोशी, तलाठी बालाजी राठोड, आरू, तळकीट, परोडवार यांच्या सह व्यापारी म्हणून सोनूशेठ आरोरा, सतिश लोकमनवार, साईनाथ मेडेवार, आदींची उपस्थिती होती.

यापूर्वी १६ डिसेंबर २०१६ रोजी तहसिलदार पाटील यांनी अशीच एक बैठक नायगाव शहरातील बँक अदिका-यांच्या उपस्थितीत घेवून कँशलेस व्यवहारासाठी पिंपळगाव, खैरगाव, बेटकबिलोली व शेळगाव गौरी या चार गावांची निवड करुन येथे दररोजचे व्यवहार करण्यासाठी नागरिकांना क्रेडीट व डेबीट कार्ड देण्याबरोबरच दुकानारांना पीओएस मशीन देणार आसल्याचे सांगितले होते पण आजपर्यंत त्या निर्णयाची अ़मलबजावणी झाली नाही हे विशेष.

Tag:
Back to Top