BREAKING NEWS

किनवटमधे भव्य शोभा यात्रेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

BY   Posted On : 22 Apr 2017 139

विश्वरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती शहर व परिसरात शुक्रवारी (दि.14) अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंतीनिमित्त अभिवादनाचा मुख्य सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अकरा वाजता संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे वंदन झाले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे व बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी सामुहिकपणे वंदना घेतली. बसस्थानकात, जेतवन बुद्धविहारात (सिद्धार्थनगर), जयभीमनगर येथे पंचरंगी धम्मध्वजाचे वंदन करण्यात आले. तसेच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार प्रदीप नाईक, माजी आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष साजीदखान, उपनगराध्यक्ष अभय महाजन, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, प्रा. किशनराव किनवटकर, श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल पाटील कर्हाळे, मुसाखान, राहुल नाईक, साप्ताहिक लोकादेशचे संपादक साजीद बडगुजर, फुलाजी गरड, प्रदीप वाकोडीकर, गजानन बोलचेट्टीवार, हबीबखान, प्रा.शिवदास बोडके, सुधाकर भोयर, प्राचार्य आनंद भंडारे, प्रा.डॉ.सुनिल व्यवहारे, अशोकराव नेम्मानीवार यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार्यांत रिपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, सेक्यलर मुव्हमेंटचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सर्पे, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव कावळे, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस प्रा.डॉ. अंबादास कांबळे, तालुकाध्यक्ष प्रा.रविकांत सर्पे, माजी नगरसेविका आशाताई कदम, प्राचार्या शुभांगी ठमके, नगरसेविका करूणा आळणे, सूर्यकांता मुनेश्वर, अॅड. जी.एस. रायबोळे, अॅड.यशवंत गजभारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर मुनेश्वर व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला. सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार आहे.

Tag:
Back to Top